विशेष प्रतिनिधी
अलिबाग : Chandrakant Patil वाघ्या कुत्र्याच्या समाधी वादावर संताप व्यक्त करत राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे सामान्य माणसाला तुमच्या या वादात रस नाही. राज्यातील नेत्यांना हात जोडून आणि साष्टांग नमस्कार घालून विनंती करतो, असे वाद उकरून काढू नका, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांचे नाव न घेता केले आहे.Chandrakant Patil
वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कुठलाही उल्लेख किंवा संदर्भ सापडत नाही. त्यामुळे अशा प्रकारे कपोलकल्पित कुत्र्याचा पुतळा किंवा समाधी उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा असल्याचे युवराज संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते.
हा पुतळा ३१ मेपूर्वी हटवावा अशी मागणी त्यांनी केली होती.या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार आणि उच्च तंत्रशिक्षणमंत्री पाटील यांनी किल्ले रायगडाची पाहाणी केली. यावेळी महिला व बाल विकासमंत्री आदिती तटकरे आणि रोजगार हमीमंत्री भरत गोगावले हेदेखील उपस्थित होते. शेलार यांनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी होत असली, तरी याबबात चर्चा करू, त्यानंतर सविस्तर अहवाल देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करू, असे स्पष्ट केले.
पाटील म्हणाले, लोकांना अशा गोष्टी आवडत नाहीत हे तुम्हाला कळत नाही का, तुमचे कान पितळी झाले आहेत का? उगाच वाद उकरून काढल्यास तेढ निर्माण होते. वातावरण खराब होते.
Chandrakant Patil said, don’t let the dispute escalate by joining hands.
महत्वाच्या बातम्या
- Manoj Jarange मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
- Kunal Kamra कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकेपासून संरक्षण
- Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्षपदी निवड अन् दोन दिवसात अण्णा बनसोडेंना उच्च न्यायालयाचे हजर राहण्याचे आदेश
- Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला