Swargate : महिना उलटूनही स्वारगेट बलात्कार प्रकरणात

Swargate : महिना उलटूनही स्वारगेट बलात्कार प्रकरणात

Swargate

दोषारोप पत्रास विलंब; डीएनए अहवालाचीही प्रतिक्षा


विशेष प्रतिनिधी

पुणे : Swargate स्वारगेट आगारात बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवाशी तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली होती. पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केली आहे. मात्र घटनेला महिना उलटून गेला तरीही गाडेविरुद्ध आरोपपत्र दाखल झालेले नाही. तसेच गाडेची डीएनए चाचणी करण्यात आली असून या चाचणीचा अहवालही पोलिसांना अद्यापही उपलब्ध झालेला नाही.Swargate

‘गाडे याची डीएनए चाचणी करण्यात आली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अद्याप डीएनए चाचणीचा अहवाल मिळालेला नाही. चाचणीचा अहवाल मिळाल्यानंतर गाडेविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. गाडे याचे कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. गाडेविरुद्ध तांत्रिक, तसेच न्यायवैद्यकीय पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या प्रकरणात पीडित तरुणीचा जबाब न्यायाधीशांसमोर नोंदवून घेण्यात आला आहे. ज्या बसमध्ये गाडेने तरुणीवर बलात्कार केला होता. त्या बसचा चालक आणि वाहक यांचेही जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.

तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेल्या गाडेने त्याचा मोबाइल संच फेकून दिला होता. तो सापडला नाही. आरोपीचा मोबाईल संच शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मोबाईल संच न सापडल्याने तपासावर कोणताही परिणाम होणार नाही. या प्रकरणात पुराव्याच्या दृष्टीने मोबाईल संच तसा महत्त्वाचा नाही, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

स्वारगेट बसस्थानकाच्या आवारातील प्रवाशी तरूणीवरील बलात्काराच्या घटनेचा तपास अंतिम टप्यात आहे. याप्रकरणी लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. येत्या काही दिवसांत त्याबद्दल माहिती दिली जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

आरोपी दत्तात्रय गाडे मूळचा शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा आहे. बलात्कार केल्यानंतर तो पसार झाला होता. गुनाट गावातील ऊसाच्या फडात तो लपला होता. तीन दिवसांनी गाडेला सापळा रचून आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली. गाडेविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस करत आहेत. तो आता न्यायालयीन कोठडीत आहे.

Chargesheet in Swargate rape case delayed even after a month; DNA report also awaited

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023