विशेष प्रतिनिधी
नाशिक : जेलवारी झाली, त्रास सहन करावा लागला. मग आता काय रडत बसू का? जे झालं ते झालं नशिबात होतं.जेलवारी आमच्या नशिबी होती ती झाली त्याच्यानंतर आपल्याला न्याय तर मिळाला अशी खंत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
आपल्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आकसाने कारवाई केली असल्याच्या आरोपाला पुनरुच्चार करताना भुजबळ म्हणाले, महाराष्ट्र सदन मध्ये काडीचाही घोटाळा नाही. सरकारने पैसे दिले नाही तर भ्रष्टचार कसा होईल ? राजकारणाचा भाग होता तो आमच्या नशिबी आला. महाराष्ट्र सदनची केस आमच्यावर कोर्टात चालली नाही. मला आणि समीर भाऊला जामीन मिळाला. त्याच्यावर ईडीने सुप्रीम कोर्टात अपील केलं होतं . आम्ही व्हीएस प्रपोज देखील दाखल केला होता. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल योग्य आहे असं ठरवले
माजी कृषि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पीकविमा गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. यावर भुजबळ म्हणाले, त्यांनाच विचारा काय ते. मला काही कल्पना नाही. मी मंत्रिमंडळात पण नाही. एखादी योजना असेल तर त्याच्यातील गैरप्रकार दूर करून लोकांच्या फायद्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे.
जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर भुजबळ म्हणाले, जितेंद्र आव्हाड अभ्यास वगैरे करतात ते खरे आहे. वाचतात वगैरे. पण कुठले शब्द कधी, कसे वापरावे ती सगळी त्यांची गडबड होते. त्यांना दुसरे पण शब्द वापरता आले असते. पाशवी बहुमत दिलं म्हणून पाशवी हा शब्द जोडून बलात्कार. स्पष्ट शब्दात बोलले तर त्यावरती वाद निर्माण होणार नाही
Chhagan Bhujbal said, Jailwari was my destiny.
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार