Devendra Fadnavis : छत्रपती संभाजीनगर उद्योगांचे नवे केंद्रबिंदू, नवीन उद्योगांची रांग, आणखी ८ हजार एकर भूसंपादनाचा निर्णय, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Devendra Fadnavis : छत्रपती संभाजीनगर उद्योगांचे नवे केंद्रबिंदू, नवीन उद्योगांची रांग, आणखी ८ हजार एकर भूसंपादनाचा निर्णय, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

devendra fadnavis

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे आता महाराष्ट्राचे ‘उद्योग मॅग्नेट’ बनत चालले आहेत, अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मांडली आहे. सध्या औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केलेली १० हजार एकर जमीन पूर्णतः व्यापली गेली असून, एकही प्लॉट उरलेला नाही. त्यामुळे नव्या उद्योगांसाठी आणखी ८ हजार एकर जमीन भूसंपादन करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

सीएमआयए (छत्रपती संभाजीनगर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. या बैठकीस संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, पणनमंत्री जयकुमार रावल, मंत्री अतुल सावे, खासदार डॉ. भागवत कराड, सीएमआयएचे अध्यक्ष अर्पित सावे व इतर अनेक उद्योजक उपस्थित होते.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी उद्योजकांना उद्देशून सांगितले की, संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ठोस प्रस्ताव घेऊन ते दिल्लीत यावेत. यावर प्रतिक्रिया देताना सीएमआयएने १००० एकर क्षेत्रात ‘डिफेन्स पार्क’ उभारण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमधील पायाभूत सुविधांमुळे उद्योगांना दुसरीकडे जायची गरज वाटत नाही. प्रशिक्षित मनुष्यबळ, उत्कृष्ट इको-सिस्टम आणि सकारात्मक औद्योगिक वातावरण यामुळेच टोयोटा सारख्या कंपन्यांनी कर्नाटकऐवजी संभाजीनगरला प्राधान्य दिले. छत्रपती संभाजीनगरातील पायाभूत सुविधा पाहून आता इतरत्र जाण्याची उद्योगांना इच्छा नाही. येथे इंडस्ट्रियल इको सिस्टिम तयार झाली आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ उद्योजकांनी हे सर्व तयार केले आहे. कर्नाटक सरकार सर्व सुविधा देण्यासाठी तयार होते. मात्र, टोयोटाने येथील सुविधा पाहून संभाजीनगरची निवड केली. आता डिफेन्स उद्योगासाठी पार्क तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले. ‘डिफेन्स क्लस्टर’ तयार करून त्यांच्यातील क्षमतांना चालना द्यावी, अशी मागणी केली.

“इथे उद्योग संघटनांमध्ये एकात्मतेने शहराच्या विकासासाठी काम करण्याची भावना दिसते, जी इतरत्र दुर्मीळ आहे. त्यामुळेच हे क्षेत्र आता महाराष्ट्राचे खरे उद्योग केंद्र बनत आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.

सध्या डीएमआयसी प्रकल्पाअंतर्गत उभारण्यात आलेल्या १० हजार एकरांमध्ये जागा उरलेली नाही, आणि नवे उद्योग येण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे राज्य सरकारने नवीन भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Chhatrapati Sambhajinagar is a new hub of industries, a line of new industries, decision to acquire another 8 thousand acres of land, announcement by Chief Minister Devendra Fadnavis

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023