Devendra Fadnavis’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता, देशमुख, वाकोडे कुटुंबियांना दिलासा

Devendra Fadnavis’ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता, देशमुख, वाकोडे कुटुंबियांना दिलासा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. परभणीचे विजय वाकोडे यांच्या मुलाला शासकीय सेवेत नोकरी मिळणार आहे.Devendra Fadnavis

बीड आणि परभणी प्रकरणांमुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. या दोन्ही घटनेतील पीडित कुटुंबियांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. देशमुख यांच्या हत्येने त्यांच्या कुटुंबियांवर मोठं संकट कोसळलं आहे. देशमुख कुटुंबियांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. मुलं लहान असल्याने देशमुख यांच्या पत्नीला मस्साजोग गावापासून जवळ असलेल्या लातूरमध्ये नोकरी मिळणार आहे. परभणीतील घटनेवेळी हृदयविकारच्या तीव्र झटक्याने मृत्यूमुखी पडलेले आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांच्या मुलाला नोकरी दिली जाणार आहे.



भाजप आमदार सुरेश धस याबाबत माहिती देताना म्हणाले, विजय वाकोडे हे मी पालकमंत्री असताना माझे मित्र होते. दुर्दैवाने त्यांचा जो अंत झाला आहे, परभणीत जे वातावरण झालं होतं ते शांत करण्यासाठी जी धावपळ केली गेली त्या धावपळीत त्यांचं दुर्दैवाने निधन झालं. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सभागृहात सांगितलं होतं. अधिवेशन संपल्यानंतर मी स्वत: परभणीला गेलो होतो. परभणीला विजय बाबांच्या घरी गेल्यानंतर सर्व कुटुंबियांना विनंती केली होती की, आपण सर्वजण मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत यावं. मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो. तिथले माजी आमदार सुरेश देशमुख, माजी महापौर सोनकांबळे, विजय वाकोडे यांचे थोरले आणि धाकटे चिरंजीव सर्वजण आले होते.विजय वाकोडे यांचा एक मुलगा शासनानात घेण्याबाबतचा निर्णय झाला.

तसेच ज्या ठिकाणी आंदोलन झालं ते स्थळ स्मृतीस्थळ होईल. विजय बाबांच्या अंत्यंविधीच्या ज्या ठिकाणी बोर्ड लावला गेला आहे तिथे स्मृतीस्थळ होईल. असे दोन्ही आश्वासन वाकोडे कुटुंबियांना दिले आहेत. जे फक्त अॅक्शन मोडमध्ये आंदोलक तरुण होते त्यांच्यावर कारवाई होईल. इतरांवर जे नोकरीस प्राप्त आहेत ते सर्व चार्जशीटमधून वगळण्यात येतील, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे.

Chief Minister Devendra Fadnavis’ sensitivity, relief to Deshmukh, Wakode families

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023