मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून रखडलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती अखेर झाली आहे. भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह सात जणांनी आमदार किती शपथ घेतली.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. Chitra Wagh with seven candidate getting MLC
त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. विधानसभेची आचारसंहिता लागायला काही तास बाकी असतानाच महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली काढलेला आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रसने आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.
khadakwasla : भाजपच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांचा गनिमी काव्याचा प्रयत्न
त्यानुसार भाजपचे तीन, शिवसेनेचे दोन आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नेते राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.
भाजप महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील आणि वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थानचे बाबूसिंग महाराज राठोड यांना भाजपने विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
माजी खासदार हेमंत पाटील आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांना संधी देण्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटाने घेतला आहे. , राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना विधानपरिषदेची आमदारकी देण्यात आली आहे.
Chitra Wagh with seven candidate getting MLC
महत्वाच्या बातम्या