ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद समोर, खैरे – दानवे आमने सामने

ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद समोर, खैरे – दानवे आमने सामने

Khaire - Danve

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकी पासूनच छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेना ठाकरे गटात असलेली खखद समोर आली आहे. आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप माजी खासदार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये राजू शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, चंद्रकांत खैरे यांच्यावर नाराज असल्याचे सांगून पक्षाचा राजीनामा दिला होता. यानंतर खैरे यांनी विरोधी पक्षनेते, अंबादास दानवे यांना लक्ष्य केले होते. ‘अंबादास दानवेंनी राजू शिंदेंना पक्षात आणले होते. दानवे मला विचारत नाही. कोणत्याही कार्यक्रमाला बोलवत नाही,’ असे म्हणत खैरेंनी नाराजी व्यक्त केली होती. तरमी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केले नाही. बाकी पक्षाच्या कार्यक्रमान कुणालाही मानपान नसतो. दर आठवड्याला मी खैरेंना भेटतो, असे अंबादास दानवेंनी म्हटले आहे.

अंबादास दानवे म्हणाले, “चंद्रकांत खैरे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक आहेत. मी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन केले नाही. माझ्या घरी लग्न झाले होते, तेव्हा त्यांना घेऊन गेलो होतो. सगळ्या व्यवस्था दाखवल्या होत्या. बाकी पक्षाच्या कार्यक्रमात कुणालाही मानपान नसतो. दर आठवड्याला मी खैरेंना भेटत असतो. यावर खैरेंना काय पाहिजे? हे मला माहिती नाही.

चंद्रकांत खैरे म्हणाले होते की, अंबादास दानवे कोणत्याही कार्यक्रमात मला बोलवत नाही, विचारत नाही. मी सुरूवातीपासून शिवसेनेचा नेता आहे. दानवे आता आले आहेत. मी शिवसेना वाढवली, टिकवली आणि मोठी केली आहे. एवढे असताना धोरणे राबवताना एकत्र बसून चर्चा केली पाहिजे. अंबादास दानवेंचे विरोधी पक्षनेतेपद ऑगस्ट महिन्यापर्यंत आहे. तोपर्यंत त्यांचे चालुद्या. विधानसभेला जिल्ह्यात एकही तिकीट मला विचारून दिले नाही, ज्या नेत्याला विचारून दिले गेले, त्या नेत्यानेच सत्ताधारी आमदारांना मदत केली असेल, तुम्ही समजून घ्या. मी एकही तिकीट दिले नाही. दुसऱ्या नेत्याने उद्धव ठाकरेंकडे नेत तिकीट दिले.

Clashes in Thackeray Shiv Sena, Khaire – Danve face off

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023