विशेष प्रतिनिधी
शिर्डी : Dhananjay Munde माझी विनंती आहे मला बदनाम करायचं असेल तर करा, पण कृपा करुन बीड जिल्ह्याला, वैजनाथ नगरीला बदनाम करु नका, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनासाठी आले असताना ते बोलत होते. मुंडे म्हणाले, बाबांच्या शिर्डीमध्ये आल्यानंतर या पवित्र स्थळी त्यांच दर्शन घेतल्यानंतर एक आगळीवेगळी उर्जा मिळते. आमच्या सारख्याला समाजकारणात, राजकारणात उर्जा मिळेत आणि आम्ही काम करतो.
बीड जिल्हा पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदारी सांभाळणार आहेत. यावर मुंडे यांचा पत्ता कापला असेही म्हटले जात आहे. यावर ते म्हणाले, बीडची परिस्थिती पाहता मी स्वत: च अजित पवार आणि मुख्यमंत्री यांना विनंती केली होती बीडच्या पालकमंत्री पदी अजित पवार यांनी जबाबदारी द्यावी. पुणे जिल्ह्याचा जसा विकास झाला तसा बीड दादांकडे असल्याने बीडचा विकास होईल आताची परिस्थिती बघता आपण ती जबाबदारी घेतली नाही पाहिजे ती अजित पवार यांच्याकडे दिली पाहिजे, असे मला वाटले. माझी पक्षाच्या प्रति भावना मी विनंती केली बीड जिल्ह्याची जबाबदारी अजित पवारांनी घ्यावी.
पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर, धनंजय मुंडे यांना मोठा धक्का, अजित पवार पुण्यासह बीडचे पालकमंत्री
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मीक कराड यांच्या संदर्भात होत असलेल्या आरोपांवर मुंडे म्हणाले, आपल्यावर केला जात असलेला एक तरी आरोप खरा करुन दाखवावा. विनाकारण त्यावर आता काय मला बोलायच नाही. मात्र ज्यावेळी बोलायचं आहे त्यावेळी मी बोलायला कमी पडणार नाही. बीड जिल्ह्यात सामाजिक सलोखा निर्माण होणं, माझ्या सारख्या नागरिकाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र त्यांचं नाव या यादीमधून वगळण्यात आलं आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. मात्र धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी करण्यात येत होती.
Defame me but don’t defame Beed district, pleads Dhananjay Munde
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती