विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : Eknath Shinde गंभीर आजारग्रस्त असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मुलींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर असताना मदतीचा हात दिला. एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट करायचे आहे तर दुसऱ्या मुलीला चीनमधील महागडे औषध आणि उपचारांची आवश्यकता आहे. रात्री विमानतळवर पोहोचल्यानंतर दोन्ही रुग्णाच्या नातेवाईकांनी भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही मुलींच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी घेतली.Eknath Shinde
खासदार धैर्यशील माने, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन्ही रुग्णांच्या बाबतीत माहिती देऊन त्यांना मदत करण्याची मागणी केली.
पोखले, ता. पन्हाळा येथील श्रावणी शिवाजी पांढरे वय वर्ष 14, ही विल्सन्स या आजारामुळे तिचे लिव्हर डॅमेज झाले आहे. आणि तिच्या मेंदूपर्यंत कॉपर पोचले असून, तिची खूप नाजूक अवस्था आहे, डॉक्टरांनी तिला लिव्हर ट्रान्सप्लांट सांगितला आहे. ऑपरेशनसाठी तिला १७ लाखांची गरज आहे. तिच्या घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तिच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी घेतली.
हातकणंगले गावातील ओवी सागर पुजारीला एसएसपीई या दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे. तिच्या उपचारासाठी चीनमधून तीन लाखांचे इंजेक्शनची आवश्यकता आहे. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये रोजच्या उपचारासाठी 25 हजारांचा खर्च आहे तसेच इथून पुढील उपचारासाठी तिला १५ लाख रुपये खर्च येणार आहे.
वरील दोन्ही मुलींच्या उपचारांची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतली आहे. या बाबतचे निर्देश पीए राहुल गेटे, प्रशांत साळुंखे यांना दिले. एकनाथ शिंदे यांनी दाखवलेल्या दातृत्वामुळे रुग्णाचे नातेवाईक गहिवरून गेले. यावेळी राज्य नियोजन महामंडळाचे कार्याध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, वैद्यकीय कक्षाचे जिल्हाप्रमुख विनायक जरांडे, पन्हाळा तालुकाप्रमुख जगन्नाथ सुतार, शहर प्रमुख मोहन खोत, महिला जिल्हाप्रमुख धनश्री देसाई, कागल तालुकाप्रमुख फरीन मकुबाई उपस्थित होते.
Deputy Chief Minister Eknath Shinde extends a helping hand to two seriously ill girls in Kolhapur
महत्वाच्या बातम्या
-
मराठीचा आग्रह धरा, पण आंदोलन थांबवा, राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश
-
Sanjay Raut संजय राऊत यांनी सोडली टीकेची पातळी, मोदी शहांचा मियाँ म्हणून उल्लेख
-
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा निर्णय, इमर्जन्सीमध्ये अनामत रक्कम न घेण्याचा ठराव
-
Rahul Gandhi : आता काेणी केली बाेलती बंद, वक्फ विधेयकावर चर्चा सुरू असताना राहुल गांधींचे मौनव्रत