Devendra Fadanvis : पवार काका – पुतण्याचा भेटीचा माध्यमांमध्ये मोठा गाजावाजा; त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला!!

Devendra Fadanvis : पवार काका – पुतण्याचा भेटीचा माध्यमांमध्ये मोठा गाजावाजा; त्याचवेळी मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शरद पवारांच्या 85 व्या वाढदिवसाची मराठी माध्यमांनी मोठी चर्चा घडवली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांना भेट देत त्यांनी मोदींचा सन्मान केला.

तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यामध्ये काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या ही भेटी घेतल्या होत्या. या दोन्हीही नेत्यांना त्यांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती भेटी दाखल दिल्या होत्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची आश्वारूढ मूर्ती देऊन त्यांचा सन्मान केला.

दुसरीकडे अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घ्यायला संसद भवनात गेले. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींच्या भेटीला त्यांच्या 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी पोहोचले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटीगाठी घेऊन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा केली. चर्चेतून भाजपला 21, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 12 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदे देण्याचे निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर सर्व नावांची निश्चिती देखील फडणवीस यांनी शाह आणि नड्डा यांच्या भेटीमध्ये केल्याचे समजते.

Devendra Fadanvis called on Prime Minister Narendra Modi

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023