विशेष प्रतिनिधी
नागपूर: Devendra Fadnavis कुठलीही शहानिशा न करता बातम्या चालल्या आहेत. प्रशांत कोरटकर दुबईला जाऊ किंवा कुठेही जाऊ पोलीस त्याला शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील म्हणजे करतील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.Devendra Fadnavis
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. पण, कोरटकर अजूनही पोलिसांच्या हाती लागला नाही. कोरटकर दुबईला पळून गेला, असे बोलले जात आहे. पण, गृहमंत्रालयाच्या मदतीशिवाय कोरटकर पळून जाऊ शकत नाहीत, असा दावा शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, कोरटकर दुबईला जाऊन किंवा कुठेही जाऊन पोलीस त्याला शोधून काढतील.
कोरटकर दुबईला पळून गेल्याच्या चर्चांवर इंद्रजित सावंत यांनी म्हटले, “कुठलीतरी यंत्रणा कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न करतेय. त्यामुळे कोरटकरला अटक होत नाही. कोरटकर कसा पसार झाला, झाला की नाही, याचा तपास पोलिसांनी केला पाहिजे.”
Police will track down Koratkar no matter where he goes to Dubai or anywhere else, CM makes it clear
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार