Devendra Fadnavis भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक

Devendra Fadnavis भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक

Devendra Fadnavis

विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील अर्थसंकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. हा अर्थसंकल्प भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. Devendra Fadnavis

फडणवीस म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी मध्यम वर्गासाठी एक स्वप्नवत असा अर्थसंकल्प मांडला आहे. अपेक्षेपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न केला आहे. १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. सात लाखांची असलेली मर्यादा थेट १२ लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. त्यामुळे आता १२ लाख उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा मोठा फायदा मध्यम वर्गीय, नोकरदार आणि तरुणांना होणार आहे. यामुळे मोठे उत्पन्न मध्यमवर्गींच्या खिशात येणार आहे. हे उत्पन्न खर्च करताना देशातील मागणी वाढेल. ज्याचा थेट फायदा सूक्ष्म, लघू आणि मध्यम उत्पादनांना होईल. यातून रोजगार निर्मितीही होईल.”

या अर्थसंकल्पात धीराने आणि धाडसाने घेतलेला निर्णय भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड ठरेल, असे माझे मत आहे. यासोबत शेती क्षेत्रासाठी १०० जिल्ह्यांमध्ये ठरवून शेती क्षेत्राचा विकास करण्याची योजना आणली जाणार आहे. तसेच तेलबियांचे उत्पादन झाल्यानंतर केंद्र सरकार १०० टक्के खरेदी हमीभावाने करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच अधिक उत्पादन मिळणार आहे. मच्छिमारांनाही क्रेडीट मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांपर्यंत बिनव्याजी वाढविण्यात आली आहे.

महाराष्ट्रासाठी या अर्थसंकल्पात खूप चांगल्या गोष्टी आहेत. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा योजनाना मोठा बूस्ट मिळणार असल्यचाहे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis announced the budget

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023