विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंजाबसारखा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरात ड्रग्जचा प्रादुर्भाव वाढवण्याचे काम सुरु आहे त्याविरुद्ध आज जर कारवाई केली तर त्याला थांबवू शकतो, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
नशामुक्त नवी मुंबई अभियानाला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आजपासून प्रारंभ झाला. यावेळी ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात नशामुक्ती अभियानाला आजपासून प्रारंभ झाला आहे. वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करणे, यासंदर्भातील माहिती प्राप्त करुन संशयितांवर कारवाई करणे हे या अभियानामध्ये असेल.
नशामुक्त नवी मुंबई अभियानाला आजपासून प्रारंभ झाला आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या ड्रग्ज विक्री विरोधात देखील मोहिम सुरु केली आहे. अपराधी नवीन नवीन पद्धती शोधत आहेत, पण पोलीस ते शोधून काढत आहेत आणि कारवाई करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली .
नवी मुंबईपासून या अभियानाला सुरुवात झाली आहे. पुढे इतरही ठिकाणी सुरु होणार आहे. ड्रग्ज विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक मोठी लढाई सुरु झाली आहे. नवी मुंबई आणि मुंबई पोलीस आयुक्तालयाने गेल्या दोन वर्षांत ड्रग्जच्या विरुद्ध विक्रमी कारवाई केली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले
udta Punjab in Maharashtra, Chief Minister Devendra Fadnavis is determined to stop the sale of drugs
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली