विशेष प्रतिनिधी
नाशिक : 2014 साली देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis हे कोणत्याही परिस्थिती शिवसेना-भाजप युती तुटू नये, या मताचे होते. तेव्हा युतीसंदर्भात त्यांची भूमिका सकारात्मक होती. तरीही भाजपचा वरून कार्यक्रम आला. त्यानुसार युती तुटली, असा गौप्य्स्फोट शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. Devendra Fadnavis
राऊत नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेला 147 जागा देण्यास आम्ही तयार होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल आणि आमचा उपमुख्यमंत्री होईल, हे सुद्धा ठरले होते. मात्र, विधाताच्या मनात मीच मुख्यमंत्री बनायचे होते. शिवसेना 151 जागांवर ठाम राहिली आणि युती तुटली, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर राऊत म्हणाले, 2014 साली भाजपचे ज्येष्ठ नेते युती तोडण्यासाठी दिल्लीतून त्यांचा कार्यक्रम घेऊन आले होते. त्याचं ठरले होते की युती तोडायची. चर्चेचा फक्त गुऱ्हाळ सुरू होता.
बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते, याचा फायदा घ्यावा. शिवसेनेला आपण संपवावे हे त्यांचे धोरण होते. भाजपला पोस्टर लावायला महाराष्ट्रात माणसे नव्हती, तेव्हा भाजपचा आम्ही खांद्यावर घेऊन फिरवले आहे. शिवसेनेच्या पोटनिवडणुकीच्या विजयानंतर भाजपला साक्षात्कार झाला की महाराष्ट्रात शिवसेना आपल्यासोबत असेल, तरच देशात आणि राज्यात आपण सत्तेत येऊ शकतो.आता 2025 आहे. पुलाखालून खूप पाणी वा हून गेले आहे. 2019 च्या निवडणुकीबद्दल बोलले पाहिजे. 2019 ला काय झाले? Devendra Fadnavis
हिंदूहृदयसम्राट हे महान हृदयाचे नेते होते. त्यांनी सांगितले होते की, ‘मतांची विभागणी नको, हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर आपण एकत्र काम केले पाहिजे.’ बाबरीच्या प्रकरणानंतर आणि अयोध्येच्या राम मंदिर आंदोलनानंतर आम्ही संपूर्ण देशात निवडणुका लढणार होते. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाची लाट देशात निर्माण झाली होती. लोकसभेला उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात अशा हिंदी भाषित पट्ट्यात 60 ते 65 जागा आम्ही लढायचे ठरले होते. या लाटेत आमच्या किमान 40 जाग निवडून आल्या असत्या, याची आम्हाला खात्री होती. हे आम्ही जाहीर केल्यावर भाजपचे धाबे दणाणले.
तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांचा बाळासाहेबांना फोन आला. त्यांनी सांगितले, ‘तुम्ही देशभरात निवडणूक लढवत आहात. त्यामुळे भाजपचे नुकसान होईल. हिंदुत्त्ववादी मते विखुरतील. त्यामुळे भाजपचा पराभव होईल आणि काँग्रेसला फायदा होईल. मी तुम्हाला विनंती करतो की तुमचे उमेदवार मागे घ्या.’ बाळासाहेब महान हृदयाचे माणूस होते. त्यांनी सांगितले की, ‘आपले उमेदवारी मागे घ्यावे. अटल बिहारी वाजपेयी यांचा फोन आला होता. आपण वाजपेयी यांचा सन्मान राखला पाहिजे,’” असे इतिहास संजय राऊत यांनी सांगितला.
“2014 साली एका-एका जागेवर 72 तास चर्चा चालली होती. ओम माथूर त्यांचे प्रभारी होते. आम्ही त्यांचा खेळ पाहत होतो. मात्र, मी एक नक्की सांगेन की, देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही परिस्थितीत शिवसेना-भाजप युती तुटू नये, या मताचे होते. युतीसंदर्भात फडणवीसांची भूमिका सकारात्मक होती. तरीही, भाजपचा वरून कार्यक्रम आला, त्यानुसार युती तुटली,” असेही राऊत म्हणाले.
Devendra Fadnavis positive page: BJP’s Delhi leaders broke the alliance, Sanjay Raut’s revelation
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप