Dhananjay Munde धनंजय मुंडे म्हणजे पुरुष वेश्या, उत्तम जानकर यांची जीभ घसरली!

Dhananjay Munde धनंजय मुंडे म्हणजे पुरुष वेश्या, उत्तम जानकर यांची जीभ घसरली!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महिला वेश्या पाहिली होती पण धनंजय मुंडे म्हणजे पुरुष वेश्या. धनंजय मुंडेंचा राजीनामा पहिल्याच दिवशी घ्यायला पाहिजे होता. गृहखात जागं असंत, शुद्धीवर असतं तर असा वाल्या कोळी तयारच झाला नसता असे म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांची जीभ घसरली.

जानकर म्हणाले, सरकार आणि वाल्मिक कराडमध्ये तडजोडी होऊनच तो पोलिसांना शरण गेला. त्यामुळे घरच्यापेक्षा चांगली सोय त्याला पोलीस स्टेशनमध्ये मिळत आहे.

“कोणत्याही परिस्थितीत ज्यांनी कोणी शरद पवारांपेक्षा अजित पवार मोठा उद्धव ठाकरेंपेक्षा एकनाथ शिंदे मोठा हे चित्र तयार केले ते वाचणार नाहीत. जरी तुमच्या हातात आज सत्ता असली तरी कुठेतरी कृष्ण जन्माला येतोच, असा इशारा त्यांनी दिला.

लवकरच राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार जाणार असल्याचा पुनरुच्चार उत्तमराव जानकर यांनी केला. येत्या 15 जानेवारीला सर्वपक्षीय 288 पराभूत उमेदवारांबरोबर ईव्हीएम संदर्भात मुंबई येथे बैठक घेणार असल्याचं उत्तमराव जानकर यांनी जाहीर केलं.

निवडणूक आयोग ऑफिसमध्ये बसून ईव्हीएम हॅक होत नसल्याचे सांगत आहे. मात्र तीच मशीन दहा मिनिट माझ्याकडे द्या, काय तंत्रज्ञान आहे, तुम्ही काय घोटाळे केलेत, कशी मते चोरलीत, हे मी पुराव्यानिशी सांगतो” असा दावा जानकर यांनी केला.

“स्वायत्त संस्था ज्या पद्धतीने काम करत आहे, हे देशाला घातक आहे, सरकार ज्या पद्धतीने या संस्थांचा वापर करत आहे, हे देखील महाभयंकर घातक आहे. निवडणूक आयोग हा भाजपसाठी “वाल्या ” म्हणूनच काम करत असल्याचा आरोप जानकर यांनी केला.

Dhananjay Munde is a male prostitute, Uttam Jankar’s tongue slips!

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023