विशेष प्रतिनिधी
मुंबई : अंजली दमानिया यांनी खोटे व बेछूट आरोप केले आहेत. कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे, असा इशारा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराडचा धनंजय मुंडेंशी संबंध असून या प्रकरणी त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. त्याचबरोबर पत्रकार परिषद घेऊन कृषी क्षेत्रातील संबंधित कथित भ्रष्टाचाराचे पुरावेच माध्यमांसमोर सादर केले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचा इशारा सोशल मीडियावर पोस्ट करत दिला आहे.
मुंडे यांनी एक्स ता सोशल मीडिया साईटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अंजली दमानिया यांनी आज पुन्हा दिवसातून दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत माझ्यावर खोटे व बेछूट आरोप केले आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, कृषी विभागातील तत्कालीन खरेदी प्रक्रिया नियमातील तरतुदीनुसार व मुख्यमंत्री महोदयांच्या अंतिम मान्यतेनंतरच झाली आहे, त्यानंतरच पुढील कार्यवाही सुरू झाली. यांसह इतर अनेक मोघम आरोप करणाऱ्या दमानिया ताई यांच्यावर मी लवकरच फौजदारी अब्रु नुकसानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करणार आहे.
आज ५८ दिवस झाले आहेत माझ्यावर मीडिया ट्रायल सुरु आहे. हा मीडिया ट्रायल का सुरु आहे? कोण चालवत आहे? हे मला माहिती नाही. आज अंजली दमानिया यांनी जे आरोप केले त्यामध्ये डीबीटीमध्ये काय असावं? काय नसावं? कोणतीही बाब डीबीटीमधून वगळण्यासाठी कृषीमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागत असते. मी कृषीमंत्री असतानाही त्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत, असे धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. कृषीसाठी लागणारी उत्पादने जड्स दराने विकत घेऊन सरकारी तिजोरीची लूट केली. एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचे पैसे किती आणि कसे खातो, कायदे कसे पायदळी तुडवतो याचे पुरावे मी देणार आहे”, असं म्हणत अंजली दमानिया यांनी थेट लाभ हस्तांतर योजनेतील कथित भ्रष्टाचार आकडेवारीसह उघडकीस आणला होता.
Dhananjay Munde will file a criminal defamation case against Anjali Damania
महत्वाच्या बातम्या
- Nirmala Sitharaman’ : कॅन्सरवरील औषधे, टीव्ही, मोबाईल आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त
- Modi Govt : मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना आजपर्यंतची सर्वात मोठी भेट, एक लोक कोटी तोटा सहन करून १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- Devendra Fadnavis भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक