Dhananjay Munde : बालेकिल्ल्यात अजित पवार पण धनंजय मुंडे नाही उपस्थित राहणार

Dhananjay Munde : बालेकिल्ल्यात अजित पवार पण धनंजय मुंडे नाही उपस्थित राहणार

Dhananjay Munde | Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

Beed News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या बीड या माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या बालेकिल्ल्यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री असलेले अजित पवार हे आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यात मुंडे उपस्थित राहणार नाहीत.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत अजित पवारांकडून जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे. अजित पवारांच्या या दौऱ्यात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हेदेखील उपस्थित असतील अशी माहिती काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून देण्यात आली होती. मात्र प्रकृती ठीक नसल्यामुळे मी मुंबईला जात असून या दौऱ्यात हजर राहू शकणार नाही, असा खुलासा मुंडे यांनी केला आहे.



धनंजय मुंडे यांनी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, “उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौऱ्यात मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही,\” अशी माहिती त्यांनी दिली आहे.दरम्यान, माझ्या अनुपस्थितीबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, अशी माझी विनंती असल्याचंही धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.

अजित पवार यांचा बीड दौरा निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी या दौऱ्यात धनंजय मुंडे उपस्थित असतील असं सांगितलं होतं. “गुढीपाडव्यानिमित्त परळीतील विविध दुकाने आणि रुग्णालयांच्या उद्घाटनासाठी धनंजय मुंडे हे हजर राहिले होते. त्यामुळे ते उद्या होणाऱ्या अजित पवारांच्या दौऱ्यावेळीही विविध कार्यक्रमांत उपस्थित असतील आणि यापुढे पुन्हा एकदा पक्षविस्तारासाठी सक्रिय होतील,” असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला होता.

केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंचं सतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप केले जात आहोत. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. यावेळी अजित पवार म्हणाले होते की , सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी मी राजीनामा दिला होता. त्यामुळे राजीनामा द्यायचं की नाही हे धनंजय मुंडे यांनी ठरवावं. आरोप सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील सूई तिथपर्यंत पोहोचली तरंच आपण कारवाई करणार ना? आता तुम्ही प्रश्न विचारला की, 2010च्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाचे आरोप झाले. त्यावेळी तुम्ही राजीनामा दिला. जो तो स्वत:चा निर्णय घेतो. त्यावेळेस माझ्या सद्विवेक बुद्धिला ते पटलं नव्हतं.

अजित पवारांनी ही भूमिका मांडून मुंडे यांच्या डोक्यावरून हात काढून घेतला. त्यानंतरच मुंडे यांचा राजीनामा झाला होता.

Dhananjay Munde will not be present during Ajit Pawar’s visit to Beed

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023