विशेष प्रतिनिधी
पुणे : रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद सुरू झाला आहे. यावरून खासदार उदयनराजे भाेसले यांनी एक दणका देऊन समाधी काढून टाकावी असे म्हटले आहे. यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उदयनराजेंवर टीका केली आहे. राजे आणि छत्रपती म्हणतो. म्हणजे तुमच्या हातात महाराष्ट्राचा सातबारा आला का? असा सवाल त्यांनी केला आहे.
‘रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे शिल्प काढून फेकून द्या. एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का?’ असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला होता. याबद्दल विचारल्यावर लक्ष्मण हाकेंनी म्हटले, “हे कायद्याचे राज्य आहे. आपण लोकशाहीत राहतो. आम्ही तुम्हाला राजे आणि छत्रपती म्हणतो. म्हणजे तुमच्या हातात महाराष्ट्राचा सातबारा आला का? मुख्यमंत्र्यांचे अधिकार तुमच्याकडे हस्तांतरित झाले का? तुम्हाला वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय असे काही आहे का? उदयनराजेंनी आमच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदर असाच राहून द्यावा. ही आमची हात जोडून विनंती आहे.
स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली. महात्मा जोतिबा फुले यांनी एका दृष्टिकोनातून थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले, असे विधान खासदार, छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे. या विधानावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उदयनराजेंवर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीची माफी मागून हा निषेध मी व्यक्त करतो, असे हाके यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीशी बाेलताना लक्ष्मण हाके म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गादीची माफी मागून मी निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्र आणि छत्रपती या शब्दाचे वेगळे नाते आहे. मात्र, कुठलाही अभ्यास न करता आणि इतिहासाची माहिती नसताना एका लोकसभेतील खासदाराने, अशी बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे सामाजिक, महिला शिक्षण, दीन-दलित, शेतकऱ्यांबद्दलचे कार्य महाराष्ट्रातील सगळ्यांना माहिती आहे.”
“स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरू केली. महात्मा जोतिबा फुले यांनी एका दृष्टिकोनातून थोरले प्रतापसिंह महाराज यांचे अनुकरण केले. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत सर्वप्रथम कोणी पाऊल उचलले असेल, तर ते थोरले प्रतापसिंह महाराज होते,” असा दावा उदयनराजेंनी केला होता.
Did you get the seven bars of Maharashtra? Laxman Hake question to Udayanraje
महत्वाच्या बातम्या