विशेष प्रतिनिधी
मुंबई : Disha Salian उद्धव गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता सूरज पांचोली आणि दिनाे मोरिया हे तिघेही दिशाच्या प्रकरणात सहभागी असल्याचा पुनरूच्चार केला. त्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी केली एका वृत्तसंस्थेशी बाेलताना आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आपण लढत असल्याचे त्यांनी सांगितले.Disha Salian
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची व्यवस्थापक असलेली दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी 14 व्या मजल्यावरून पडून झाला. त्यानंतर आठवड्याभरातच अभिनेता सुशांत सिंह याचा राहत्या घरी मृतदेह आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे नुकतेच सीबीआयने दिलेल्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मात्र, दिशाच्या वडिलांनी या प्रकरणी पुन्हा एकदा याचिका दाखल केल्याने हे प्रकरण पुन्हा पेटले आहे. दरम्यान, दिशाचा पोस्टमॉर्टम अहवाल बुधवारी समोर आला. त्याबाबतही दिशाच्या वडिलांनी संशय व्यक्त केला आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मंगळवारी पोलीस आयुक्तालयात एक पत्र देत आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी उद्धव गटाचे आमदार आदित्य ठाकरे जबाबदार असल्याचे सांगितले होते. याशिवाय त्यांनी अभिनेता डिनो मोरिया, सूरज पांचोली यांच्यासोबतच परमबीर सिंह, सचिन वाजे आणि रिया चक्रवर्तीला देखील आरोपी ठरवत त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती.
सतीश सालियन म्हणाले, मुंबई पोलिसांकडे मी माझ्या मुलीसाठी न्याय मागितल्याचे सतीश सालियन यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. मी माझ्यासाठी आणि माझ्या वकिलांसाठी संरक्षण मागितल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मी नार्को टेस्टसाठी तयार आहे. पण मग माझ्यासोबत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली या सगळ्यांची देखील नार्को टेस्ट व्हायला पाहिजे, जवळपास अडीच वर्षे ते सत्तेत होते. त्यानंतर त्यांनी एका एसआयटीची स्थापना केली. पण, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळेच मला आता समोर येऊन हे सगळे करावे लागत आहे, न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझ्या मुलीने जे काम केले ते मी पूर्ण करणार आहे. त्यासाठी मला आरोपीचा शोध घेऊन त्याला शिक्षा करायची आहे. आपल्यावर कोणाचाही दबाव नाही.
दिशाच्या वडिलांचे वकील नीलेश ओझा म्हणाले, या प्रकरणाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना पोलीस संरक्षण द्यावे. जवळपास 15 महिन्यांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे. काही प्रमुख गोष्टींसाठी क्राईम सीन पुन्हा क्रिएट करायला हवा.
Disha Salian’s father demands narco test of Aditya Thackeray, Suraj Pancholi and Dino Morea
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची