विशेष प्रतिनिधी
Raigad News: जिजाऊंनी बाल शिवाजींवर संस्कार केले. शिवचरित्र हे देशातील प्रत्येक मुलाला शिकवले पाहिजे. शिवाजी महाराजांना फक्त महाराष्ट्रापुरते सीमित ठेवू नका. त्यांचे विचार हे देशातील प्रत्येक मुलांना शिकवले पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी केले.
किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मानवंदना दिली. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवंद्रफडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार उदयनराजे भोसले, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री भरत गोगावले, मंत्री अदिती तटकरे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
अमित शहा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र मी वाचले आहे. अटक ते कटक पर्यंत राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्याकडे ना सैन्य होते, ना संपत्ती होती मात्र दुर्दम्य साहस होते. त्याच्या जोरावर त्यांनी उत्तम प्रशासन असलेले हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यामुळे आज आपला धर्म, संस्कृती वाचली आहे. स्वतःला आलमगिर म्हणवणाऱ्यांची इथेच कबर खोदली.
गुलामीची मानसिकता तोडण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा आपण स्वयंपूर्ण झालेलो असू, असा विश्वास व्यक्त करत अमित शहांनी म्हणाले, शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हे आजचे आमची कॅबिनेट आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांची मुद्रा भारत सरकारच्या नौदलावर गोंदले आहे.
Don’t limit Shivaji Maharaj to Maharashtra only, appeals Amit Shah
महत्वाच्या बातम्या