विशेष प्रतिनिधी
पुणे : हिंजवडीमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागली नाही तर ड्रायव्हरनेच रसायनांचा स्फोट घडून आणला अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पगार कापला म्हणून बदला घेताना चौघांचा हकनाक बळी केला. ड्रायव्हरचा दिवाळीत पगार कापला होता. गाडीतील कर्मचारी त्रास देत होते म्हणून त्याने हे कृत्य केले.
जनार्दन हंबर्डीकर असे या चालकाचे नाव आहे. त्याचा तिघांशी वाद होता. त्यांना मारायचं म्हणून त्याने हा प्रकार केला. पण या घटनेत चौघांचा निष्पाप बळी गेला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली होती.
कंपनीच्या कामगारांना घेऊन चाललेल्या टेम्पो ट्रॅव्हलरला सकाळी आठच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी चालकाची प्रकृती गंभीर आहे. बसमध्ये एकूण 12 कामगार होते.
हिंजवडी मधील ती घटना अपघात नसल्याचे समोर आले आहे. या घटनेत स्वत: चालकाने केमिकल आणून सीट खाली ठेवून भडका घडवून आणला. फेज १ मध्ये एकेरी वाहतूक रस्ता सुरू झाल्यावर त्याने काडी पेटवून आग लावली आणि केमिकलचा भडका उडाला. भडका उडण्यापूर्वी तो गाडीतून उतरला होता, अशी माहिती समोर आली आहे.
Driver sets tempo traveler on fire in Hinjewadi, four killed in revenge for salary cut
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची तिच्या वडिलांची उच्च न्यायालयात याचिका
- Devendra Fadanvis : पुण्यात कोयता गँग नाही पण भाई होण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून दहशत, मुख्यमंत्र्यांची माहिती
- Hemant Rasne : हिंजवडी दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याची आमदार हेमंत रासने यांची विधानसभेत मागणी
- Eknath Shinde : दोन्ही शिवसेनेत एक्स वॉर, एकनाथ शिंदे राजकीय कीड म्हणाल्याने आदित्य ठाकरेंवर सूर्याजी पिसाळ मनात पलटवार