Ajit Pawar : अजित पवार यांच्या विदेश दौऱ्यामुळे रखडल्या पालकमंत्र्यांच्या नेमणुका!

Ajit Pawar : अजित पवार यांच्या विदेश दौऱ्यामुळे रखडल्या पालकमंत्र्यांच्या नेमणुका!

Ajit Pawar

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ajit Pawar उपमुख्यमंत्री अजित पवार विदेश दौऱ्यावर गेलेले आहेत. ते आज येतील सोमवार किंवा मंगळवारी सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची नाव घोषित होणार आहेत तीनही प्रमुख नेते एकत्र बसुन निर्णय घेतील, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत दिली.Ajit Pawar

शिरसाट म्हणाले, मस्साजोग हत्या प्रकरणावर आज सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा निघतोय. राज्यातील प्रत्येक नागरिकांला वाटत आहे या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे. जे आरोपी आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आरोपीला सरकार सोडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे .आपल्या यंत्रणा काम करत आहे नागरिकांच्या भावनांचा विचार करुन आरोपींवर कडक कारवाई केली जाईल. आरोपीला फाशी मिळत नाही तोवर सरकार थांबणार नाही



धनंजय मुंडे राजीनामा मागणीबाबत ते म्हणाले,तपासात जोपर्यंत कोणी गुन्हेगार म्हणून समोर येत नाही तोपर्यंत राजीनामा घेणं न घेणं हा त्या त्या पक्षाचा निर्णय आहे

महापालिका निवडणूका संदर्भात ते म्हणाले, काल एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगरच्या लोकांनी पक्षात प्रवेश घेतला. येत्या आठवड्यामध्ये संभाजीनगर मधल्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा आमच्या पक्षात प्रवेश होणार आहेत, महाराष्ट्रातील सगळ्या भागातील लोक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करायला इच्छूक आहेत

संजय राऊत सगळ्या भूमिका सहकार्याच्या दाखवतील. विधानसभेत जनतेने त्याच्यावर जो औषध उपचार केला आहे.त्यामुळे ते नरमाईची भूमिका दाखवतील. त्याच्याकडे आता काही पर्याय राहिलेला नाही काँग्रेस त्यांना आता विचारत नाही, शरद पवार कुठे आहेत यांना माहिती नाही. लढणं त्याच्या मनंगटात राहिलेलं नाही, असा टोला शिरसाठ यांनी लगावला.

सुरेश धस यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले ,आरोपी, प्यादे वजीर कोण आहे ते यंत्रणा तपास करून काम करत आहे. तपास यंत्रणेत हस्तक्षेप करणे योग्य नाही

कोण मुख्य आरोपी तपासात येऊ द्या. आरोप केला आणि फाशी दिली असं करता येत नाही. तातडीने कारवाई होत नसते.तपासात कुणीही अडथळा आणू नये. पुण्यात वरदहस्त असेल तर तपासात समोर येईल.

Due to Ajit Pawar’s foreign tour, the appointments of the Guardian Minister are stalled!

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023