उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, गाडी उडवून देण्याची धमकी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, गाडी उडवून देण्याची धमकी

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी, गाडी बॉम्बने उडवणार असल्याचा ई मेल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी ईमेल द्वारे देण्यात आली आहे. त्यांची गाडी बॉम्बने उडवणार असल्याचे या ईमेलमध्ये म्हटले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी आली आहे. मुंबईतील अनेक पोलिस स्टेशनमध्ये हा धमकीचा मेसेज आल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी याबाबतच्या तपासाला सुरुवात केली आहे. हा धमकीचे ईमेल कुणी केला याबाबत अद्याप कुठलीही माहिती पुढे आली नाही. एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवणार असल्याचे यात म्हटले आहे. या पार्श्वभूमिवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून याबाबतचा सखोल तपास करण्यात येत आहे.

गोरेगाव पोलिसांना आणि मंत्रालयाला धमकीचा ईमेल मिळाला आहे. मंत्रालय, जेजे मार्ग पोलिस स्टेशन, गोरेगाव पोलिस स्टेशनला धमकीचे ईमेल आले आहेत. एकनाथ शिंदे शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीत आले असून आज दिल्लीहून मुंबईला परतणार आहे, त्यामुळे सुरक्षा दलांना सतर्क ठेवण्यात आले आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत.

यापूर्वीही ठाण्यातील एका तरुणाने व्हिडीओ पोस्ट करत शिंदे याना जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा तरुण मानसिकमरुग्ण असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते.

E-mail threatening to kill Deputy Chief Minister Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023