Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले

Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Eknath Shinde एकनाथ शिंदे यांच्या उठावामध्ये मी सामिल होतो. त्यामुळेच मला राज्याच दोन वेळा उद्योग मंत्री पद मिळाले. त्यांनी राजकीय जीवनामध्ये मला घडविण्यासाठी प्रयत्न केले ते मी कधीही विसरु शकत नाही. माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध राजकारणाच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे आमच्यात कोणीही वाद लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही, असा पलटवार उद्योग मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केला आहे.Eknath Shinde

मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच उदय सामंत त्यांना धक्का देण्याच्या तयारीत होते. उदय सामंत यांच्याबरोबर २० आमदार आहेत, असे सांगत राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याची शक्यता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. यावर उदय सामंत म्हणाले, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल केलेल वक्तव्य बघितलं आणि ऐकलं देखील आहे. हा धादांत राजकीय बालिशपणा आहे

मला बदनाम करा पण बीड जिल्ह्याला बदनाम करु नका, धनंजय मुंडे यांची विनंती

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामिल होतो. त्यामुळेच मला राज्याच दोन वेळा उद्योग मंत्री पद मिळालं याची मला पुर्ण जाणीव आहे. अशा सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडविण्यासाठी प्रयत्न केले ते मी कधीही विसरु शकत नाही. आणि माझे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध राजकारणाच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे आमच्यात कोणीही वाद लावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही.

एकनाथ शिंदे यांच्या नाराजीवर ते म्हणाले, नाराजी दाखवून काही पदरात मिळेल हा प्रयत्न सुरू आह. शिंदे यांची परिस्थिती आजच्या राजकारणात बिकट आहे. शिंदे यांची गरज संपली का? . उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं. आता शिंदेंना संपवून नवीन ‘उदय’ पुढे येईल. तो उदय कुठला असेल, शिवसेनेच्या बाबतीत त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल, असा आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्यावर प्रतिहल्ला करताना उदय सामंत म्हणाले, वडेट्टीवारांनी भाजप प्रवेशासाठी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. ते म्हणाले, विजय वडेट्टीवार देखील काय तरी बोलले असं मला कळलेलं आहे, विजयजी मला असं वाटतं एकनाथ शिंदे सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाले आहेत. मी सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातून मोठा झालेलो आहे आणि तुम्ही सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातून मोठे झाला आहात. त्यामुळे सर्वसामान्य कुटु्ंबातील लोक एकत्र असतील तर त्यांना बाजुला करण्याच षडयंत्र आपण खेळू नका. तुम्ही देखील भाजप मध्ये येण्यासाठी किती वेळा देवेंद्र फडणवीस यांना भेटलात याची पुर्ण माहिती माझ्याकडे आहे. मी राजकीय तत्व पाळतो. त्यामुळे वैयक्तिक टीका टिप्पणी करत नाही. परंतू एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असे फालतू षडयंत्र करु नये ही माझी सुचना आहे . संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलेले वक्तव्य निषेध करण्यासारखं आहे. मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत होतो आणि भविष्यात त्यांना ज्या ज्यावेळी माझी गरज लागेल त्यावेळी त्याचा सहकार्यी म्हणून त्यांच्या सोबत आहे.

Eknath Shinde and my relationship is beyond politics, says Uday Samant to those who try to argue

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023