विशेष प्रतिनिधी
दरे (सातारा) : Eknath Shinde काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली हाेती. यावेळी मनसे आणि शिवसेना शिंदे गट महापालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात हाेती. मात्र, राज ठाकरे यांनी अचानक भूमिका बदलत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना साद घातल्याने शिंदे चांगलेच चिडले आहेत. पत्रकारांच्या या संदर्भातील प्रश्नावर ते चांगलेच चिडले.Eknath Shinde
एका मुलाखतीमध्ये बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करण्याचा प्रस्ताव ठेवला. महाराष्ट्राच्या हितापुढे मी माझा इगो पाहत नाही, असे राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होत असल्याची चर्चा सुरु झालीय. यावर प्रतिक्रिया देताना मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिडल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देणे टाळले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या दरे गावी आहेत. यावेळी पत्रकारांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. त्यावर एकनाथ शिंदे चिडल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांनी पत्रकाराला मागे सरकवत जाऊ दे यार, काय करता कामाचं बोला असे सुनावले.
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. यादरम्यान महापालिका निवडणुकांसाठी एकत्र राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी भेटीत महायुतीबद्दलची कुठलीही चर्चा नव्हती, ही केवळ सदिच्छा भेट होती. बाळासाहेबांच्या आठवणींना यावेळी मनमोकळेपणाने उजाळा दिला, असे म्हटलं होतं.
Eknath Shinde gets angry on the issue of Uddhav-Raj Thackeray coming together
महत्वाच्या बातम्या
- Fadnavis Government : अपघातग्रस्त रुग्णांवर 1 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार, फडणवीस सरकारचा निर्णय
- Vijaya Rahatkar राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांनी घेतली मुर्शिदाबाद दंगलपीडितांची भेट, मालदाच्या शरणार्थी शिबिरात महिलांनी कथन केले अंगावर शहारे आणणारे अनुभव
- Raj Thackeray : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका
- MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांपुढे झुकली; मुख्य परीक्षा पुढे ढकलली, पदसंख्या वाढवण्याच्या मागणीला चालना