Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले अमितभाई.. आपके इरादो से चट्टाने भी डगमगा जाते हैं!

Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले अमितभाई.. आपके इरादो से चट्टाने भी डगमगा जाते हैं!

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

रायगड : Eknath Shinde  अमितभाई आपके इरादो से चट्टाने भी डगमगा जाते हैं, दुश्मन क्या चीज हैं, तुफान भी आपना रूख बदल देता हैं,” अशी शायरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे कौतुक केले. ( Amit bhai apke irado se chattane bhi dagamga jaate hain…Eknath Shinde’s praise of Amit Shah through poetry)

शनिवारी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी होती. अमित शाहांनी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केले. यावेळी रायगडावरती राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार इत्यादी नेते उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.



म्हणाले की, अमित शाह यांनी एकदा ठरवले की ते करून दाखवतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी कलम 370 हटवले. तसेच अमित शाह यांचे वक्फ बोर्डाच्या विधेयकावेळी केलेले भाषण अंगावर शहारे आणणारे होते. सीमेवरील शत्रू बिळात बसले आहेत. कारण, अमित शाह आणि पंतप्रधान मोदींमुळे देशामध्ये हिंसा पसरवणारे लोक, दहशतवादी असतील अतिरेकी असतील त्यांचा बंदोबस्त करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर 26/11 चा मास्टरमाईंड राणाला भारत आणले आणि आता त्याला फासावर चढवले जाईल. ही कामगिरी आपल्या पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची आहे.आपल्या आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात हा देश पुढे जात आहे. देशाचा विकास होत असून राज्याचादेखील विकास होत आहे, असे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांना तसे फार मोठे आयुष्य मिळाले नाही. आणखी 20 ते 30 वर्षे महाराज असते तर देशाचा इतिहास बदलला असता, असे सांगून शिंदे म्हणाले, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालत आहे. आपल्या इतिहासाचे जतन केले पाहिजे तसेच अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे. गडकोट किल्ले आपला इतिहास असून त्याचे संवर्धन, जतन झाले पाहिजे. यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. एएसआयनेदेखील सहकार्य केले पाहिजे हीच अमित शाहांना विनंती आहे,” अशी विनंती केली आहे.

Eknath Shinde said, Apake Iradese Chattane Bhi Dagamaga Jati Hai

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023