विशेष प्रतिनिधी
मुंबई : ईडी अन् काय काय म्हणता. पण आणिबाणीच्या काळात विराेधी पक्षाच्या एक लाखांहून अधिक लाेकांना जेलमध्ये टाकले. जाॅर्ज फर्नांडिस यांच्या कुटुंबासोबत जे काही झाले, ते सर्व काही आठवल्यानंतर आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे उभे राहतात अशी त्यावेळची अवस्था होतील, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशानाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. अगदी आपल्यावरची आपबिती सांगताना ते म्हणाले, माझे वडील 2 वर्ष जेलमध्ये होते. काकी शोभाताई जेलमध्ये होत्या. संविधान बचाव तुम्ही आज म्हणता, पण आणीबाणी आली तेव्हा मुलभूत अधिकार कायद्याने निलंबित केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य काढून घेतले. राज्य कायद्याने नाही हुकूमाने चालेल अशी व्यवस्था तयार झाली होती. 1971 मध्ये मिसा कायदा आणला, कॉंग्रेसच्या काळात आणलेल्या या कायद्याने सर्वसामान्यांचे मुलभूत अधिकार हिसकावून घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जॉर्ज फर्नांडिस यांच्या कुटुंबासोबत जे काही झाले, ते सर्व काही आठवल्यानंतर आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे उभे राहतात अशी त्यावेळची अवस्था होती. 1 लाखाहून अधिक विरोधी पक्षातील नेते जेलमध्ये टाकले होते. दाेन वर्ष मिसा कायदा लावला. तुम्ही केले काय, तुमचा गुन्हा काय हे सांगायला तयार नव्हते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान गोठवून तुम्ही अख्खा विरोधी पक्ष जेलमध्ये टाकायचा ठरवला होता.
सध्या देशातील संस्थांवर होणाऱ्या टीकेबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “तुम्ही बघा देशाच्या सर्व संस्थांना कलंकित करायचे, त्याच्यावर बोटे उचलायची, त्या संस्थांना एकप्रकारे अराजकाकडे न्यायचे हे चाललेले आहे. आपल्याला सत्तेत येता येत नाही मग अशाप्रकारे देशाच्या संस्था बदनाम करायच्या. या संस्था आपण जेव्हा बदनाम करतो, तेव्हा आपण संविधानावर अविश्वास दाखवतो. कारण या संविधानाने या संस्था निर्माण केल्या आहेत. या संस्था इतक्या भक्कम करण्यात आल्या आहेत की, त्या कोणी तोडू शकणार नाही. त्यामुळे कोणीही जन्माला आले तरी या संविधानाने तयार केलेल्या संस्थांचे काही वाईट होऊ शकणार नाही.
संविधानावर बोलताना नानाभाऊ पटोलेंनी राजकीय भाषण करू नये म्हणून आवाहन केले, पण सर्वात जास्त राजकीय तेच बोलले, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला.
Even Today, Tears in My Eyes and Goosebumps: CM Attacks Congress While Recalling Emergency Ordeal
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप