विशेष प्रतिनिधी
सांगली : nitesh rane विरोधक ईव्हीएमच्या नावाने बोंबलतात. ईव्हीएमला दोष देतात. पण आम्ही ईव्हीएम वरच निवडून आलोय. ते ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स मुल्ला, असे वक्तव्य मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले.nitesh rane
सांगली येथे पत्रकारांशी बोलताना विशाळगडावर 12 तारखेला कसा उरूस होतो हे बघायचंच आहे असा इशारा देताना राणे म्हणाले, ज्याने भगवाधारी सरकार आणलं त्यांचं संरक्षण करणे ही आमची जबाबदारीमहाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार आहे.
सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका करताना नीतेश राणे म्हणाले, सांगलीत दोन कत्तलखाने सुरू आहेत, ते कसे सुरू आहेत हे खासदार विशाल पाटील यांनी सांगणे गरजेचे होते. परंतु मी फाटक्या तोंडाचा आहे हे त्यांना माहिती होते. म्हणूनच, माझ्या भाषणापूर्वीच ते येथील कार्यक्रमातून निघून गेले. जो नियम हिंदूंना लागू होतो तो इतर धर्माला देखील लागू झाला पाहिजे. आता सरकार हिंदुत्ववादी आहे, आता कोणाचे लाड चालणार नाहीत, असेही नीतेश राणे म्हणाले.
दरम्यान, 12 जानेवारी रोजी विशाळगडावर उरूस निघत असतो. यावर बोलताना नीतेश राणे म्हणाले, 12 तारखेला विशाळगडावर उरूस काढण्याचे नियोजन आहे. तिथे काही महिन्यांपूर्वी काय घडले आहे हे सर्वांना माहीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. हिंदू समाजाच्या एकंदरीत इच्छेनुसार 12 तारखेला कोणीही विशाळगडावर कायदा व सुव्यवस्था खराब करण्याचे काम करू नये, असे आवाहन नीतेश राणे यांनी केले आहे.
हिंदू समाजाने संयमाने घेतले असताना इतर समाजानेही संयमाने घ्यावे, उगाच कोणालाही चिथावण्याचे काम करू नये. उरूस काढून कोणालाही चिथावण्याचा प्रकार करू नये. शासन म्हणून आम्ही या घटनांवर लक्ष ठेऊन असणार आहोत, असेही नीतेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.
EVM stands for Every Vote Against Mullah, Nitesh Rane Says Will Protect Hindus
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली