विशेष प्रतिनिधी
मुंबई : Eknath Shinde ओरंगजेबाची कबर आणि नागपूर हिंसाचार यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाष्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर राजकारणी कीड अशी जहरी टीका केली. शिवसेना शिंदे गटानेही आदित्य यांच्यावर सूर्याजी पिसाळ असा निशाणा साधला आहे.Eknath Shinde
आदित्य ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे कि, मुख्यमंत्र्यांनंतर आज विधिमंडळात गद्दार उपमुख्यमंत्री बोलायला उभे राहिले, औरंग्यावर बोलायला..त्याच्यावर बोलणारे हे कोण?, रायगडच्या पालकमंत्र्यांनी ठेवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांवरच्या चित्रपटाच्या शो वर बहिष्कार टाकणारे! का? तर ह्यांच्याकडे रायगडचं पालकमंत्री पद आलं नाही म्हणून! जिल्हा कुठला? छत्रपती शिवरायांच्या राजधानीचा, रायगड! चित्रपट कुठला? छत्रपती संभाजी महाराजांवरचा! स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणी कीड, औरंग्याबद्दल आणि छत्रपती शिवरायांबद्दल बोलणार? हे तेच आहेत जे राज्यात द्वेष पसरवून राज्य पेटवू पाहत आहेत. अशा निर्लज्जांनी आम्हाला शिकवू नये.
आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदेसेनेही पलटवार करत उत्तर दिले आहे. हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी करुन औरंगजेबी विचारांचा हात धरणारे आदूबाळ हे आजचे सूर्याजी पिसाळ आहेत. सत्तेसाठी काँग्रेसी गुळाला चिकटलेले हे मुंगळे बाळासाहेबांनी वेळीच चिरडून टाकले असते. ज्यांच्या मांडीला मांडी लावून उबाठा आणि आदूबाळ हिंदुत्वाच्या विरोधात कट रचत आहेत, त्यांच्याच काळात औरंग्याच्या कबरीला कायदेशीर संरक्षण दिले ह़ोते. या दोघांच्यात थोडीही जनाची नाही तर मनाची शिल्लक असेल तर त्यांनी काँग्रेसचा निषेध करण्याची हिंमत दाखवावी असं शिंदेसेनेने म्हटलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे नातेसंबंध न पाहता केवळ शौर्य आणि नेतृत्वगुणाला महत्त्व देणारे होते. त्यांने नाव घेणारे आजचे महाराष्ट्र द्रोही मात्र नकळत्या वयातल्या लेकराला मंत्री करतात. मग पोरगं खांद्यावर बसलं की एक पाय वर करतं आणि भूंकतंही अशी टीकाही शिंदेसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरेंवर करण्यात आली आहे.
Ex-war in both Shiv Senas,counterattacks on Aditya Thackeray as Suryaji Pisal after he calling Eknath Shinde a political pest
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप