विशेष प्रतिनिधी
मुंबई : MLA Asif Sheikh लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मालेगावमध्ये ‘व्होट जिहाद’साठी बाहेरून ‘फंडिंग’ आले, असा गौप्यस्फोट माजी आमदार आसिफ शेख यांनी केला आहे. यासंदर्भातील पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.MLA Asif Sheikh
विधानसभा निवडणुकीत मालेगावचे विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती यांच्याकडून अवघ्या काही मतांनी असिफ शेख यांना पराभव स्वीकारावा लागला होता. एका मुस्लीम माजी आमदाराने ‘व्होट जिहाद’ झाल्याचे मान्य केल्यामुळे विरोधकांचा कुटील डाव उघड झाला आहे. यासंदर्भात आपल्याकडे सर्व प्रकारचे पुरावे उपलब्ध आहेत. गरज वाटल्यास तपास यंत्रणांना आपण हे पुरावे देण्याची तयारी ठेवली आहे, असे असा दावा माजी आ. शेख यांनी केला आहे.
या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेणार आहे. माझ्याकडे ‘व्होट जिहाद’ संदर्भात असलेले पुरावे त्यांना सादर करणार आहे. मालेगावात निवडणुकीसाठी पैसा आला होता. बाहेरून आलेला हा पैसा विद्यमान आमदाराच्या मदतीसाठी होता, असा दावाही माजी आ. आसिफ शेख यांनी केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांसमोर याविषयीचे पुरावे दाखल करण्याची तयारी सुद्धा त्यांनी दर्शवली. आपल्याकडे या सर्व आरोपांविषयी भक्कम पुरावे असल्याचा दावा शेख यांनी केला.
एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात वोट जिहादचा उल्लेख करत निवडणुकीत बाहेरून पैसा आल्याच्या आरोपावर कानावर हात ठेवले आहेत. आपल्याला एकही रुपया मिळाला नसल्याचे ते म्हणाले.
सरकारने या सर्व प्रकरणात ईडी, एटीएस, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून कसून चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार शेख यांनी केला. हा पैसा कुणी आणि कुणासाठी वापरला हे तपासात निष्पन्न होईल, असे ते म्हणाले. त्यामुळे आता हा मुद्दा पुन्हा एकदा तापल्याचे दिसून आले आहे. शेख यांच्याकडे पुरावे असतील तर ते त्यांनी सादर करावे, असे आवाहनच एमआयएमचे आमदार मुफ्ती इस्माईल शेख यांनी केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात मालेगाव मर्चंट बँकेतील खात्यांमध्ये अचानक 125 कोटी रुपये जमा झाले होते .त्याविषयी किरीट सोमय्या यांनी सुद्धा आवाज उठवला होता. हा इतका पैसा कुठून आणि कसा आला असा सवाल त्यांनी केला होता. तर वोट जिहादसाठी हा पैसा वापरण्यात आल्याचा आरोप त्यावेळी किरीट सोमय्या यांनी केला होता.