विशेष प्रतिनिधी
बुलढाणा : शेगाव तालुक्यातील तीन गावांमध्ये नागरिकांना अचानक केसगळती सुरू झाली आहे. टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात तीन गावांमध्ये जवळपास ५० हून अधिक व्यक्तींना अचानक केसगळती होत आहे. काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. हा आजार नेमका कोणता आहे, याबाबत सर्वच अनभिज्ञ असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात आजारने थैमान घातले असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला डोके खाजवणे, नंतर सरळ केस हातात येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गावांमध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरात असलेल्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
पाण्याचा अहवाल आल्यावरच याचे कारण समोर येईल, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.
Hair loss on the first day and baldness on the third day, unknown disease in Shegaon taluka
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली