विशेष प्रतिनिधी
मुंबई : मोदी सरकारचा कारभार म्हणजे ‘दाल में कुछ काला’ नाही तर अख्खी डाळच काळी आहे. त्यांची नियत खोटी आहे आणि निती तर नाहीच. अशा शक्तीविरोधात आपल्याला लढायचे आहे. कामगारांचे शोषण होत असताना आपण शांत बसून चालणार नाही. त्यामुळे कृती कार्यक्रम घेऊन काम करा आणि मोठी चळवळ उभी करून एकत्र येऊन लढा द्या, असे आवाहनही सपकाळ यांनी केले.
राष्ट्रीय मजदूर काँग्रेसच्या राज्यस्तरीय संमेलनात बोलताना सपकाळ म्हणाले, आधी उद्योगपती होते, आता व्यापारी झाले आहेत. हे व्यापारी फक्त नफ्यासाठी काम करत असून त्यांना कामगारांच्या कल्याणाचे काहीही देणेघणे नाही. मोदी सरकारच्या कामगार विरोधी धोरणांमुळे देशात श्रीमंत अधिक श्रीमंत होत चालला आहे तर गरीब अधिक गरीब होत चालला आहे. पण देशाच्या पंतप्रधानांना गरिबांची चिंता नाही. केंद्र आणि राज्यातील सरकार हे गरिब, कष्टकरी, कामगारांच्या विरोधातील आहे.
सपकाळ म्हणाले, कामगार संघटना एकेकाळी मोठी शक्ती होती. आपल्या हक्कांसाठी चक्का जामचा नारा दिला तर बंद होत होता, पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. अनेक उद्योग बंद पडत आहेत. तर जे आहेत त्यात आऊटसोर्सिंग तसेच कंत्राटी पद्धतीने कामगार भरती केली जात असून यातून शोषणाचे प्रमाण वाढत आहे. हे शोषण फक्त शहरात होत नाही तर ते गावखेड्यापर्यंत पोहचले आहे. ही शोषणावर आधारित व्यवस्था संपवण्याची गरज आहे. त्यासाठी भविष्यातील संकटे ओळखून संघटीतपणे लढा द्या.
Harshvardhan Sakpal appeals to form a big movement against the exploitation of workers and fight together
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची