विशेष प्रतिनिधी
मुंबई : हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली, काय केलं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली?, औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे, जनाची नाही तर मनाची तरी ठेवा, असा संताप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच फडणवीस क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत आहेत.
औरंगजेबाची कबर उचलून टाका, असं सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे, असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं. यावर शिंदे म्हणाले, हा औरंगजेब या आंदोलनकर्त्याचा कोण लागतो. या आंदोलनकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे, छावा पाहिला पाहिजे. त्याचं समर्थन करणं म्हणजे देशद्रोह्याचं समर्थन करणं आहे. देशाचा द्रोही त्याचं समर्थन म्हणजे देशद्रोहचं समर्थन.
नागपूर हिंसाचाराची माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, नागपूरमध्ये जमावाने काही घरांना लक्ष केले जाळपोळ केली. मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान केलं. काही लोकं जिवानीशी वाचली. पोलिसांवर दगडफेक झाली. काही लोक जखमी झाले. ही घटना पूर्वनियोजित होती असे दिसतंय, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ज्या मोमीनपुरामध्ये घटना घडली तिथे एरवी अनेक गाड्या पार्क असायच्या, मात्र काल त्या नव्हत्या. काही मंदीरातील फोटो जाळले.
अग्निशमन दलाच्या जवानांवर हल्ले केले. पोलिसांवर दगडफेक करणं हे दुदैवी आहे. समाजकंटकांना शोधून कडक कारवाई होईल. नागपूर हे शांतता प्रिय शहर आहे. दोन समाजात तेढ निर्माण केली जात आहे. पोलीस मूळाशी जाऊन तपास करतील. आपण सर्वांनी सहकार्य करावं शांतता राखावी.
Harshvardhan Sapkal’s eyes were cut out, his tongue was cut out, Eknath Shinde questioned for criticizing the Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप