विशेष प्रतिनिधी
पुणे : Harshvardhan Sapkal मी कुठेही देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अपशब्द वापरले नाहीत. एकेरी उल्लेख केला नाही. त्यांनी औरंगजेबासारखी वेशभूषा करावी, फक्त तेवढाच फरक आहे, असेही मी म्हटले नाही. मी फक्त राज्य कारभारावर टीका केली.” असे स्पष्टीकरण देत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिकवून यू टर्न घेतला आहे.Harshvardhan Sapkal
सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबाशी केल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. त्यामुळे यू टर्न घेत त्यांनी म्हटले आहे की औरंगजेब हा क्रूर होता, तेवढ्याच क्रूर पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्रामध्ये कारभार करत आहे, असे माझे विधान होते. पण यावरून भाजपची पोटदुखी झाली आणि भाजपनेच त्यांची तुलना औरंगजेबाशी केली असल्याचा कांगावा केला.
मी जो काही राज्यकारभार सुरू आहे, त्यावरून मी तुलना केली. पण, कालपासून भाजपच्याच लोकांनी त्यांनीच थेट देवेंद्र फडणवीस यांची तुलना ही औरंगजेबाशी केली आहे. माझी तुलना ही राज्य कारभाराशी होती. पण, भाजपचे सर्व जे नेतेमंडळी आहेत, त्यांनीच ‘देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबासारखे होते,’ असा कांगावा केला आहे. याचाच अर्थ, देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याच पक्षातील लोकं हे औरंगजेब ठरवू पाहत आहेत, हे स्पष्ट होते.” असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. “नारायण राणे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे इतरही काही भाजपची मंडळी माझ्यावर टीका करताना जी भाषा वापरत आहेत, ती विचित्र स्वरुपाची आहे. स्वतः सुसंकृत पक्षातील नेते म्हणवणारे हे लोकं काय शब्दावली वापरत आहेत? हे सर्व काही भाजपचा चेहरा समोर येईल, असेही सपकाळ म्हणाले.
Harshvardhan Sapkal’s U-turn on criticism of Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Anjali Damania : हे सर्व जण तुमच्याच तालमीत तयार, तुम्हीच मोठे केलेत, अंजली दमानिया यांनी शरद पवारांना सुनावले
- Harshvardhan Sapkal सत्ताधारी पक्षातील लोकांकडून दहशत, हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
- Devendra Fadanvis : बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाचा विस्ताराचा निर्णय!