विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Nirupam मुंबईमध्ये मुस्लिम बिल्डरांनी हाऊसिंग जिहाद सुरु केला आहे. त्यामुळे मुंबईची मुंब्रा होण्याची भीती आहे. मुस्लिम लोकसंख्या वाढविण्यासाठी हे केले जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी केला आहे. (Housing Jihad in Mumbai,” Alleges Sanjay Nirupam)Sanjay Nirupam
पत्रकार परिषदेत निरुपम यांनी या हाऊसिंग जिहाद मागील मोडस ऑपरेंडीचा पर्दाफाश केला. ते म्हणाले, मुंबईमध्ये मुस्लिम बिल्डर आहेत. ते सगळे एक हिंदू सोसायटी घेतात. फ्रॉड करुन त्यामध्ये अजून एखादं ,स्ट्रक्चर जोडून मोठा प्रोजेक्ट बनवतात. अतिरिक्त भागातात मुस्लिम लोकांना सामील करतात. एक एक मुस्लिम लोकांच्या नावाने 19 ते 30 घर लॅाट केली जातात, तो रुल एसआरएच्या विरोधात आहे. हा अत्यंत मोठा प्रकार हाऊसिंग जिहादचा सुरु आहे. या कारणास्तव पुढे मुस्लिम लोकसंख्या वाढेल.
संजय निरुपम यांनी गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यात आरोप केला आहे कि, हे बिल्डर्स एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू लोकांचे अर्ज नाकारून मुस्लिम लोकांना जास्तीत जास्त सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या ‘हाउसिंग जिहाद’ द्वारे मुस्लिम बिल्डर्स मुस्लिम लोकसंख्येची घनता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
या हाऊसिंग जिहादमुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलेल, हिंदू मायनसमध्ये येणार , मुंबई ही मुंब्रा सारखी होईल हा एक संशय आहे . यासाठी मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. जे रिडेव्हलपमेंट मध्ये मुस्लिम बिल्डर आहेत त्यांच्या विरोधात चौकशी समिती नेमावी आणि हाऊसिंग जिहादचा केवढा मोठा प्रकार सुरु आहे ते बघावा, अशी मागणी निरुपम यांनी केली.
Housing jihad by reducing Hindus in SRA projects, Sanjay Nirupam alleges
महत्वाच्या बातम्या