विशेष प्रतिनिधी
पुणे : Manoj Jarange Patil माझा लढा सामाजिक आहे. मुख्यमंत्र्याच्या शब्दावर मराठे शांत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरण दबू देणार नाही.आता मी थेट मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे की तुमच्या सरकार मध्ये राहून जातीय तेढ निर्माण केली जात आहे. राज्यभर मराठे मोर्चे काढणार आहेत असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.Manoj Jarange Patil
पुण्यातील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांनी धोका दिला असा संदेश जाईल. आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत? धनंजय मुंडेंनी हे सगळं थांबवावे. मी जातीवाद करत नाही. मी फक्त गरीब मराठ्यांना आरक्षण आणि संतोष देशमुख यांना न्याय मागत आहे.धनंजय मुंडेंची लोकं धनंजय देशमुख यांना धमक्या देतात. इथून पुढे जर त्रास दिला तर जशास तसे उत्तर देणार लक्ष्मण हाकेला मी कधीही विरोधक मानलं नाही, मी कुठल्याच जातीवर बोललो नाही असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ पुण्यात जनआक्रोश मोर्चा निघाला आहे. मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच या घटनांचा निषेध करण्यासाठी आज पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. लाल महाल येथून आज सकाळी अकरा वाजता जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. हा मोर्चा लाल महाल, फडके हौद चौक, खडीचे मैदान चौक, १५ ऑगस्ट चौक, लडकत पेट्रोल पंप, नरपतगिरी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नेहरू रस्ता, गणेश रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या मोर्चामध्ये भाजपाचे आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, मनोज जरांगे पाटील, आमदार संदीप क्षीरसागर आणि देशमुख कुटुंबीय सहभागी होणार आहेत.
How are the accused found in Pune? Question by Manoj Jarange Patil
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली