विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची तीन यंत्रणांकडून स्वतंत्रपणे या हत्येची चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या चौकशीत कोणाचीच नावे पुढे आलेली नाहीत. जोपर्यंत कोणावर ठपका ठेवला जात नाही तोपर्यंत कारवाई कशी करणार? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे एका अर्थाने त्यांनी धनंजय मुंडे यांना अभयच दिले आहे.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करत सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती.अजित पवार परदेश फोर्यवरून परतल्यावर कालच धनंजय मुंडे यांच्याशी त्यांची तासभर चर्चा झालो. या चर्चेनंतर अजित पवार यांनी चौकशीत अद्याप कोणाचेच नाव पुढे नसल्याचे सांगत मुंडे यांना अभय दिले.
मुंडे यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सोमवारी भेट घेतली. मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला असतानाच सोमवारी सायंकाळी मुंडे यांनी अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. सुमारे तासभर उभयतांमध्ये खलबते झाली. त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येची विशेष चौकशी पथक, बीड पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. याशिवाय न्यायालयीन चौकशीची घोषणा झाली आहे. जेव्हा-केव्हा चौकशीत नावे समोर येतील तेव्हा कारवाई करू, असे सांगत अजित पवारांनी मुंडे यांना एका अर्थी अभय दिले.
त्यावरून अजित पवार गटाचे नेेते दमानियांना लक्ष्य करीत असतानाच धमक्या देणऱ्यांविरोधात कारवाईची मागणी भाजप महिला विभागाच्या प्रदेशाध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी पोलीस सहआयुक्तांकडे केली.
How to take action until there is no reprimand? Clean chit to Dhananjay Munde from Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- Girish Mahajan : काँग्रेससह सर्वच पक्षातील नेते येण्यासाठी नंबर लावून बसलेत, गिरीष महाजन यांचा मोठा दावा
- Narahari Zirwal: दैवताला सोडून जाताना लाज वाटली नाही का?; जितेंद्र आव्हाड यांचा नरहरी झिरवळ यांना सवाल
- Chief Minister Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांचा बनावट व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची ओळख पटली