विशेष प्रतिनिधी
मुंबई: Nitesh Rane गोहत्या बंदीच्या कायद्याला अधिक कडक करायला मी मुख्यमंत्र्यांना सांगेन. याद्या द्या. कत्तलखाने नष्ट करु हा माझा शब्द आहे.मी मंत्री आणि आमदार नंतर आहे पहिला हिंदू आहे. महाराष्ट्राला कत्तलखाना मुक्त करून दाखवू असा विश्वास बंदर आणि मत्स्य मंत्री नितेश राणे यांनी व्य क्त केला.Nitesh Rane
महाराष्ट्राचे मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी हिंदुत्ववादावर ठाम राहण्याची ग्वाही देत, महाराष्ट्रातील हिंदू समाजाने हे सरकार निवडून आणल्याचा पुनरुच्चार केला. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या मंत्रिपदाच्या शपथेच्या वेळी राज्यभरातून लोकांचे फोन आले आणि “आमचा आवाज विधानसभेत पोहोचला” असे लोकांनी सांगितले.
नितेश राणे म्हणाले, “आपले तरुण मोठ्या प्रमाणावर हिंदुत्वासाठी काम करत आहेत. मुख्यमंत्री एक कट्टर हिंदुत्ववादी आहेत. आता कोणत्याही गोरक्षकाला त्रास होणार नाही. महाराष्ट्रातील गोहत्या बंदीचा कायदा अधिक कडक करण्यात येईल आणि कत्तलखाने बंद करण्याची दिशा दाखवली जाईल. उगाच कुणाच्या दाढ्या कूरवाळू देणार नाही .
गोहत्या बंदीचा कायदा प्रत्येकाला पाळावाच लागेल
ते पुढे म्हणाले, “कायदे पाळणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्रशासनातील अधिकारी जर कत्तलखान्यांना मदत करत असतील तर त्यांची नावे मला पाठवा. देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील.”
राणे यांनी राज्यातील हिंदूंना आश्वासन दिले की, “आता महाराष्ट्रात हिंदू म्हणून मोकळेपणाने फिरा. आम्ही सरकारमध्ये आहोत, चिंता करू नका.” तसेच, गोरक्षकांसाठी सरकारकडून संरक्षण आणि सेवा देण्याचे वचन त्यांनी दिले.
गोहत्या बंदीचा कायदा अधिक प्रभावी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. “माझा शब्द आहे, महाराष्ट्र कत्तलखाना मुक्त करून दाखवू. मी मंत्री आणि आमदार नंतर आहे, पण आधी हिंदू आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
-आम्ही हिंदुत्ववादी आहोत. हिंदुत्वाचे काम करतो असं म्हणत थाटात फिरा. राज्यात हिंदू म्हणून आता फिरणार नाही तर महाविकास आघाडीच्या काळात फिरणार का ? आता आम्हाला धमक्या देण्याची गरज नाही सरकार आमचं आहे असे ते म्हणाले.
I am the first Hindu after Minister and MLA, Nitesh Rane said my word will destroy the slaughterhouses
महत्वाच्या बातम्या
- South Korea दक्षिण कोरियात 181 जणांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात, 28 ठार; लँडिंग गिअर बिघडले, धावपट्टीवर स्फोट
- Goa : गोवा बनावटीची 31 लाख रुपयांची दारू जप्त
- उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना उडवलं, एकाचा मृत्यू
- Suresh Dhas : प्राजक्ता माळी विषय संपलाय, मी माफी मागणार नाही, सुरेश धस यांनी केले स्पष्ट