विशेष प्रतिनिधी
जळगाव : आपण निवडून येणार याची मलाही गॅरंटी नव्हती, पण लाडक्या बहिणीनी साथ दिल्याने आम्हाला मोठा आधार मिळाला आहे. यावेळची मतदानाची टक्केवारी जर बघितली तर महिलांनी आम्हाला खूप खूप मदत केली आहे, असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.सरकार सुद्धा महिलांच्या पाठीशी उभे असून महिलांसाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
एका कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले, खरं सांगायला गेलं तर यावेची हवाच तशी होती….मलाही वाटायचं की आता माझंही खरं नाही..लोकही म्हणायचे की माझे काय खरं नाही.पुन्हा मी येत नाही. गुलाबराव पाटील गेला डब्यात. पण लोकांनी छप्पर फाडके मत दिली आपल्याला आणि निवडून दिला आपल्याला. खरं म्हणायला गेलं तर महायुती यावेळी एवढी घट्ट होती.. की त्याचा परिणाम सर्वत्र पाहायला मिळाला. लाडकी बहीण जरी ती काँग्रेसची होती तरी तिने 1500 रुपये पाहून आपलं बटण दाबलं असेही त्यांनी सांगितले.
जळगाव जिल्ह्यात तर 11 च्या 11 जागा या आपल्या निवडून आल्या आहेत. विरोधकांना बोहनीसुद्धा करता आलेली नाही. सांगायची गोष्ट झाली तर दोन्ही खासदार आपले. 11 चे11आमदार आपले. नशीब आपले बघा केंद्रात एक मंत्री आणि राज्यात तीन मंत्री आपले. तीन कॅबिनेट मंत्री एकाच वेळी आपल्या जळगाव जिल्ह्याला मिळाले आहेत. यावेळी मला मंत्रिपद मिळेल का नाही याची गॅरंटी नव्हती, कारण वाटा पाडणारे तीन आणि निवडून आलेले 237, पण मी मंत्री झालो असेही गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.
I was elected because of Ladki Bahin, Gulabrao Patil said I had no guarantee
महत्वाच्या बातम्या