विशेष प्रतिनिधी
जळगाव : Ramdas Athawale संविधान निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा वाटा आहे. राजेंद्र प्रसाद आणि पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार म्हणून संबोधले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्यात अजून 10 ते 15 वर्षे राहिले असते, तर ते पंतप्रधान झाले असते, असे विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते जळगावात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.Ramdas Athawale
रामदास आठवले म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात अनेक मुस्लीम मावळे होते. शिवाजी महाराजांनी हिंदू-मुस्लीम भेद केला नाही. पण, महाराष्ट्रात काहीजण आक्रमक भूमिका मांडत समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील भारत उभा करायचा असेल, तर हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध, जैन, पारशी, लिंगायत या सर्व धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन आपला बंधूभाव वाढवला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फार मोठ्या कष्टाने संविधान लिहिले आहे. संविधानातील भारत उभा करायचा असेल, तर हिंदू-मुस्लीम वाद निर्माण होता कामा नये.”
“संविधान हे संविधान सभेत पास झाले आहे. परंतु, त्यात सर्वात मोठा वाटा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. संविधान आले की तिथे बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव येतेच. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा मसुदा डॉ. राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलाल नेहरू यांना दिला, तेव्हा, त्यांच्या तोंडातून उद्गार निघालेले की, ‘बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत.’ बाबासाहेबांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष न देता संविधान लिहिले,” असे आठवलेंनी सांगितले.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 मध्ये झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अजून 10 ते 15 वर्ष आपल्यात राहिले असते, तर ते देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते. परंतु, बाबासाहेब आपल्यातून लवकर निघून गेले,” असेही आठवलेंनी म्हटले.
If he had lived for another 10 to 15 years, Dr. Babasaheb Ambedkar would have been Prime Minister, claims Ramdas Athawale
महत्वाच्या बातम्या
- 10th-12th board दहावी- बारावी बाेर्डाची वेबसाईट हाेणार सायबर सुरक्षित, निकालाच्या दिवशी येणार नाही ताण
- Kedar Jadhav : माजी क्रिकेटपटू केदार जाधवची राजकारणात नवी इनिंग
- Phule Movie : चित्रपटामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो, ‘फुले’ चित्रपटावर ब्राह्मण महासंघाच्या नेत्याचा आक्षेप
- Sandeep Deshpande : भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचं का, मनसेच्या इशाऱ्याने परप्रांतीय वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे