विशेष प्रतिनिधी
माळशिरस : Malshiras taluka सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे बीड घटनेसारखाच निघृण खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Malshiras taluka
एका युवकाची अज्ञात कारणातून निघृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या युवकाचा विवस्त्र अवस्थेत शरीरावर चटके दिलेला मृतदेह सापडला.या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
आकाश अंकुश खुर्द (वय २८) असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दि. १० मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आकाश हा पिलीव येथील आपल्या घरी कुटुंबियांसह होता. या दरम्यान, त्याला अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्यानं आपल्या आईला दहा मिनिटांत परत येत असल्याचं सांगितलं आणि तो घराबाहेर पडला. मात्र संपूर्ण रात्र उलटूनही तो घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी मंगळवारी पिलीव-माळशिरस रस्त्यावरील वनक्षेत्रात विवस्त्र अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.
या तरुणाच्या संपूर्ण पाठीवर सळईने चटके दिल्याच्या खूणा आहे. अख्ख्या पाठीवर एकही जागा नाही जिथं चटके दिलेले नाहीत.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आकाशच्या पाठीवर, दंडावर, मांडीवर आणि पोटावर मारहाण करून चटके देण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्याला पूर्णपणे विवस्त्र करून निघृणपणे त्याचा खून करण्यात आला आहे. प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबंधातून त्याचा खून झाला असण्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांना ताब्यात घेतले आहे. माळशिरस पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
In Malshiras taluka, brutality similar to the Beed incident, youth was murdered by being stripped naked and given hot iron rods
महत्वाच्या बातम्या
- धार्मिक व्देष पसरवून महाराष्ट्राचा तालीबान करण्याचा भाजपाचा डाव हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
- एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची मुदत ३ महिने वाढवा, आमदार शिरोळे यांची मागणी
- मल्हार मटणावरून जितेंद्र आव्हाड यांचे मटण पुराण
- खोक्या भोसले याला अखेर प्रयागराजमधून अटक