विशेष प्रतिनिधी
बीड : Beed महाराष्ट्रातील बीड जिल्हा सध्या गाजत आहे. गुन्हेगारीपासून जातीयवादाच्या जिल्हा ग्रस्त आहे. पोलीस दलही त्याला अपवाद नाही. यावर आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी अभिनव उपक्रम सुरु केला आहे.Beed
बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीसोबतच जातीय तणाव देखील निर्माण होत आहे. यामुळे साामाजिक सलोखा बिघडला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. बीडमध्ये पोलिस अधीक्षकांपासून पोलीस शिपायापर्यंत सर्वांनी फक्त पहिल्या नावाचाच वापर करायचा आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या नाम फलकापासून (नेमप्लेट) टेबलवरील आणि वर्दीवर लावण्यात येणाऱ्या नेमप्लेटमधून आडनाव काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस अधिकारी आणि पोलिस शिपाई यांनी फक्त फक्त पहिल्या नावाचा वापर करावा असे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहे.
पोलिसांनी एकमेकांना आडनावाऐवजी केवळ नावानेच हाक मारावी असा उपक्रम बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सुरू केला होता . या उपक्रमाचे चांगले परिणाम दिसू लागल्यानंतर कॉवत यांनी आणखी एक पाऊल टाकलं आहे. त्यांनी पोलिसांच्या छातीवर असलेल्या नेमप्लेटवरील पोलिसांची आडनावं हटवली आहेत. आता बीड पोलिसांच्या नेमप्लेटवर केवळ त्यांची नावं व पदं नमूद करण्यात आली आहे. या नव्या उपक्रमाबद्दल माहिती देताना कॉवत म्हणाले, “आम्हा पोलिसांची कुठलीही जात नाही, आमचा कुठलाही धर्म नाही, आम्ही सर्वांसाठी केवळ ‘खाकी’ आहोत.”
पोलिसांच्या नेमप्लेटवरील आडनावं हटवण्याची मोहीम सुरू करणारे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत म्हणाले, कर्तव्यामधून जात काढून टाकण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. तत्पूर्वी आम्ही पोलिसांनी एकमेकांना नावाने हाक मारायचा उपक्रम राबवला होता. आता पोलिसांच्या नेमप्लेटवरून आडनावं काढून केवळ नावं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.