महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकावरून जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्य सरकारने ‘महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयक २०२४’ हे विधेयक आणले आहे. महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

या विधेयकावरून सरकारवर टीका करताना आव्हाड म्हणाले की तुम्हाला महाराष्ट्रातला विद्रोह संपून टाकायचा आहे. म्हणजे संतोष देशमुख मारला गेला, त्याला पोलिसांनी मारला आहे, हे बोलायचं नाही, बोललो तर जितेंद्र आव्हाड जेलमध्ये जाणार. अक्षय शिंदेचा गुन्हा दाखल करा हे परत एकदा कोर्टाने सांगितलं ना? आता मी जर यावर बोललो तर मी जेलमध्ये? वाल्मीक कराड विरोधात आम्ही उघडपणे बोलत होतो आज तो जेलमध्ये आहे. आम्ही जेलमध्ये आहे का? आम्ही मुक्त व्यवस्थेत जगणार, पण तुम्ही जातीयवादी मानसिकतेचे आहात हा माझा खुला आरोप आहे.

एक विधेयक येतंय, महाराष्ट्र सुरक्षा कायदा असं काहीतरी बकवास नाव दिलेलं आहे. आता सरकारला महाराष्ट्रातला विद्रोह बंद करून टाकायचा आहे. आमच्याबद्दल कोणी काय बोलायचं नाही, सरकारी योजना विरोधात काही बोलायचं नाही, एखादी गोष्ट जर पटली नाही तर बोलायचं नाही, म्हणजे लोकांनी तोंडाला चिकटपट्ट्या लावून घ्यायच्या आणि व्यक्तच व्हायचं नाही.



तुमची एखादी संघटना असेल ती संघटना सरकारला आवडली नाही तर ती बंद, संघटनेत काम करणारे तीन वर्षे आतमध्ये जाणार आहेत. महाराष्ट्र हे तर विद्रोहाचे जन्मस्थान आहे, आपल्या आईने सती जाऊ नये यासाठी पहिला विद्रोह शिवाजी महाराजांनी केला होता. आम्ही लिबरल आहोत, आम्ही नेहरूंचे आणि गांधीजींचे वंशज आहोत, आम्ही अन्यायाविरोधात बोलणारच असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर दिले आहे.

आदिवासी मागासवर्गीय निधी कापण्यावरून यांच्या मंत्री संजय शिरसाट यांनी विरोध केला आहे, मी मनापासून संजय शिरसाट यांचे अभिनंदन केलं आहे. शिरसाट हा पहिला माणूस आहे, आजपर्यंतच्या मंत्रिमंडळात अनेक मंत्री बघितले, मागासवर्गीयांचा निधी मुद्दामहून कापला जातो आणि संजय शिरसाट यांनी हिंमत दाखवली आणि विरोध केला, मी उघडपणाने शिरसाट यांच्या बाजूने आहे. संजय शिरसाट यांच्याबद्दल मला प्रचंड आदर निर्माण झाला आहे, त्यांनी या महाराष्ट्र सरकारचा चेहराच उघडा करून टाकला आहे असेही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

itendra Awhad alleges that the rebellion in Maharashtra needs to be ended, on the Maharashtra Special Public Safety Bill

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023