विशेष प्रतिनिधी
मुंबई : एका शोमध्ये विडंबनात्मक गाण्याद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार अशी टिप्पणी करणारा कुणाल कामरा Kunal Kamra हा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा माणूस आहे असा दावा माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी केला आहे.
कामराच्या टीकेमुळे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. शिवसेना संजय निरुपम म्हणाले, कामराने जे केलं, ते व्यंग नाही, हा गंभीर आरोप आहे. तुम्ही आमच्या नेत्याला म्हणता गद्दार आहात. शिवसेनेत काय होतं हे माहीत आहे का ? गद्दारीचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का? 2022मध्ये शिंदेच्या नेतृत्वात 40 पेक्षा अधिक आमदारांनी बंडखोरी केली, ती गद्दारी नव्हती शिवसेनेला करेक्ट डायरेक्शनला आणण्याचा तो प्रयत्न होता. Kunal Kamra
कुणाल कामरा कोण आहे. तो संजय राऊतचा खास माणूस आहे. संजय राऊत बरोबर कुणाल कामराचा फोटो आहे. त्यांचं काय घेणंदेणं आहे माहीत नाही. कुणाल कामरा काँग्रेसच्या इको सिस्टिमचा एक मेंबर होता. राहुल गांधी यांच्याबरोबर फिरतो. त्यांच्यासोबत राहतो. सुप्रिया सुळे आणि शरद पवार सोबतही त्याचे फोटो आहेत,असा दावा निरुपम यांनी केला.
गद्दारी उद्धव ठाकरेंनी केली. त्यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं. काँग्रेसशी युती केली. ते करेक्ट करण्यासाठी शिंदे यांनी बंडखोरी केली. संपूर्ण देशात फक्त उद्धव ठाकरे आणि त्यांचेच लोक शिंदेंना गद्दार म्हणतात. बाकी कोणी म्हणत नाही. कामराने सुपारी घेऊन हे सुरू केलं,असे आरोप संजय निरुपम यांनी केले.
शिवसेना आमदार मनिषा कायंदेंनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. कुणाल कामराने टिप्पणी केली नाही तर तो खालच्या स्तरावर जाऊन बोलला आहे. आम्ही देखील कुणाल कामरा यांच्या घरी जाऊन त्यांना शिवी देऊन आणि वरून संविधानच पुस्तक दाखवून फ्रिडम ऑफ स्पीच आहे असं म्हणू. ते चालेल का? असा सवाल कायंदे यांनी केला. आम्ही महिला शिवसैनिक आक्रमक होऊ आणि 2 दिवसात त्याने जर माफी मागितली नाही तर त्याचं तोंड आम्ही काळ करू असा इशारा कायंदे यांनी दिला.
दरम्यान शिवसेना कार्यकर्त्यांनी काल रात्री मुंबईतील हॉटेलमध्ये जाऊन कामराच्या शोच्या सेटची तोडफोड केली, नासधूसही केली. या तोडफोडीप्रकरणी खार पोलिसांनी 11 शिवसैनिकांना अटक केली आहे. द हॅबिटॅट स्टुडिओची 60 ते 70 लोकांन तोडफोड केली होती. त्याचप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. थोड्याच वेळात या 11 आरोपीना वांद्रे कोर्टात हजर करण्यात येणार आहे. राहुल कनाल, कुणाल सरमळकर यांना सीआरपीसी 41 अंतर्गत नोटीस देण्यात आली.
Kunal Kamra is Sanjay Raut’s man, claims Sanjay Nirupam
महत्वाच्या बातम्या
- Narayan Rane : नारायण राणे म्हणाले, दोन्ही पुत्र कर्तृत्ववान, मला माझ्या दोन्ही मुलांची घमेंड
- Supriya Sule : बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, आणखी एक मंत्र्याचा बळी जाणार असल्याचा सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट
- Purandar Airport, : पुरंदर विमानतळासाठी एक पाऊल पुढे, सात गावांमधील क्षेत्र औद्योगिक म्हणून जाहीर
- Jayakumar Rawal : मंत्री जयकुमार रावल यांनी शासनाची फसवणूक करून दोन कोटी 65 लाख रुपये लाटले, अनिल गोटे यांचा आरोप