Kunal Kamra कुणाल कामराला पोलिसांचे समन्स, पोस्ट लिहून त्याने मांडली भूमिका

Kunal Kamra कुणाल कामराला पोलिसांचे समन्स, पोस्ट लिहून त्याने मांडली भूमिका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त गाणे म्हणणारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र कुणाल मुंबईत नसल्याने कुणालच्या वडिलांकडे हे समन्स सोपवण्यात आले. त्याला व्हाट्सअप द्वारे समन्स पाठवले असून चौकशीसाठी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामरावर कठोर कारवाई आश्वासन विधानसभेत दिले. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांची माफी मागावी, अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीसांसह महायुतीतील नेत्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामराचं वर्तन योग्य नाही. फ्रिडम ऑफ स्पीच असलं तरीही काहीही बोलता येणार नाही कारवाई होईल असं म्हटले आहे.

दरम्यान, कुणाल कामराने माय स्टेटमेंट म्हणत चार पाणी पोस्ट लिहून आपली भूमिका मंडळी आहे. यामध्ये तो म्हणतो “ज्या ठिकाणी माझा शो आयोजित करण्यात आला होता, ती अशा प्रकारच्या शोचीच जागा आहे. हॅबिटट हे ठिकाण, तो स्टुडिओ जे काही घडलं त्यासाठी जबाबदार नाही. या ठिकाणी तोडफोड करण्यात आली. त्या ठिकाणी अपशब्दही वापरले गेले. लॉरी भरुन टॉमेटो आणले गेले असं मी ऐकलं कारण आम्ही जे बटर चिकन तुम्हाला वाढलं ते तुम्हाला आवडलं नाही.



मला धडा शिकवण्याच्या धमक्या देणाऱ्या राजकीय नेत्यांसाठी : अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा अधिकार आहे. तो अधिकार फक्त श्रीमंतांकडे नाही. तुमच्यासारखे लोक जोक सहन करु शकत नाहीत. एखाद्या वजनदार राजकीय माणसामुळे माझा जो अभिव्यक्तीचा हक्क आहे त्यावर काही परिणाम नाही. मी कायद्याच्या विरोधात काहीही वागलेलो नाही. राजकीय सर्कशीवर आणि राजकारणावर मी व्यंगात्मक पद्धतीने बोट ठेवलं आहे, असेही त्याने म्हटले आहे.

असो.. तरीही मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचं ठरवलं आहे. पोलिसांनी आणि न्यायालयाने माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. मात्र कायदा सर्वांसाठी समान असतो त्यामुळे अशाही लोकांविरोधात कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते हॉटेल फोडलं. एक जोक ऐकून त्यांनी हॉटेल फोडलं आहे. तसंच जे निवडून आलेले नाहीत अशा महापालिका सदस्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे. हॅबिटट या ठिकाणी तोडफोड करायला ते कुठलीही नोटीस न देता हातोडे घेऊन कसे आले? असे प्रश्न कुणाल कामराने विचारले आहेत.

माझा फोन नंबर लिक केला गेला आहे. त्यानंतर मला असंख्य कॉल आले आहेत. आता मी ते व्हॉईस मेलवर फॉरवर्ड केले आहेत. मीडियाला माझं सांगणं आहे की तुम्ही जे काही कव्हर करत आहात आणि बातम्या करत आहात ना त्याआधी एक बाब लक्षात ठेवा की पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत आपल्या देशाचा क्रमांक १५९ वा आहे.मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही. मी कुणालाही घाबर नाही. मी माझ्या पलंगाखाली लपून बसलेलो नाही. असंही कुणाल कामराने म्हटलं आहे

Kunal Kamra summoned by police, he wrote a post to express his position

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023