विशेष प्रतिनिधी
मुंबई : डिसेंबर महिन्याच्या लाडकी बहिण योजनेच्या वितरणाची सुरुवात आजपासून होत आहे. आजचा हफ्ता वितरण करत असताना 2 कोटी 34 लाख महिलांचा समावेश असणार आहे , अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
त्या म्हणाल्या, ज्या महिलांना आधार कार्ड सिडींग मुळे वंचित राहावं लागत होतं त्यांच्या आधार सिडिंग झालेल्या महिलांच्या खात्यात सुद्धा हे पैसे आज पासून मिळून जातील. येत्या चार ते पाच दिवसात टप्प्याटप्प्याने याच वितरण होऊन जाईल. 2 कोटी 34 लाख पुढच्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे
तटकरे म्हणाल्या, लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ राज्याच्या तीन लाडक्या भावांमुळे मिळत आहे. लाडक्या बहिणी योजनेतून मिळालेल्या पैशाचा वापर कुटुंबासाठी आणि घरातील सुख-समृद्धीसाठी करण्यात यावा.
Devendra Fadnavis : राहुल गांधी परभणीला आले, राजकारण पेरून गेले; मुख्यमंत्र्यांसह भाजपचा हल्लाबोल!!
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची घोषणा महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात केली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लक्ष लागले आहे. मात्र या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणे मिळणार आहे. 2100 रुपये मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.
2100 रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदा मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार आहे. यासाठी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. डिसेंबर महिन्यांच्या अंतिम महिन्याच्या आठवड्यात सर्व पैसे दिले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 35 लाख महिलांना लाभ मिळणार आहे. त्यानंतर उर्वरित महिलांना पैसे दिले जाणार आहे. योजनेसाठी लागणारा 3500 कोटी रुपयांची निधी वर्ग करण्यात आला आहे.
Ladki Bahin Yojana for the month of December
महत्वाच्या बातम्या
- PM मोदींना कुवेतचा सर्वोच्च सन्मान, ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्राप्त करणारे पहिले भारतीय पंतप्रधान
- Ajit Pawar : भुजबळांचे जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना वर अजित पवार म्हणाले….
- राज – उध्दव ठाकरे नात्यात संजय राऊतांचा बिब्बा, म्हणाले मोदी, शहा, फडणवीस राज यांचे आयडॉल
- वाळू माफियांची दादागिरी मोडून काढणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा