विशेष प्रतिनिधी
जळगाव : जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळत चालली असून सरपंचांच्या हत्या, लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न, तसेच महिलांवरील वाढत्या अत्याचारांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “आम्हालाच न्याय मिळत नसेल, तर सर्वसामान्य जनतेला काय न्याय मिळेल?” असा सवाल उपस्थित केला.
त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अलीकडील घटनांचा उल्लेख करत सांगितले की जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. सरपंच आणि उपसरपंचांच्या हत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. लोकप्रतिनिधी देखील सुरक्षित नाहीत.महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जळगावातील उपसरपंचाची हत्या आणि धरणगावात मुलीच्या छेडछाडीच्या घटना धक्कादायक आहेत. खासदार रक्षा खडसे यांच्या मुलीच्या बाबतीत तीन आठवड्यांपासून आरोपी सापडलेले नाहीत.
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंच्या आरोपांना प्रतिउत्तर देत जळगाव जिल्ह्याची बदनामी करण्याचे काम विरोधक करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले –जळगावातील घटना गायीच्या भांडणातून घडली असून ती चुकीच्या पद्धतीने सादर केली जात आहे. विरोधी पक्ष जिल्ह्याची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. घटनेची संपूर्ण माहिती न घेता आरोप करू नयेत. मलाही मुलगी आहे, त्यामुळे अशा आरोपांमध्ये जबाबदारीने बोलले पाहिजे,” असा सल्लाही त्यांनी दिला.
गुलाबराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाच्या कबरीवरील वादावर भाष्य करत सांगितले की औरंगजेब कसा संत होता असे विधानसभेत काही आमदारांनी वक्तव्य केले होते, त्यांना समज दिली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. औरंगजेब क्रूर होता; त्याने स्वतःच्या वडिलांना तुरुंगात टाकले आणि छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला. धर्म न सोडणाऱ्या संभाजी महाराजांची तुलना औरंगजेबाशी केली जात असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही.
नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत विचारले असता गुलाबराव पाटील म्हणाले की, “हा विषय माझा नाही, तो तिघा नेत्यांचा आहे. मात्र, मला पालकमंत्री बनविल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.”
Law and order issue on the agenda in Jalgaon district, Eknath Khadse attacks the government
महत्वाच्या बातम्या
- नागपूर हिंसाचाराचे प्लॅनिंग सोशल मीडियावरून, यूट्यूबरसह एमडीपीचा कार्यकारी अध्यक्ष अटकेत
- Mahavitaran महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार
- Ajit Pawar जयंत पाटलांसोबत झाली एआयवर चर्चा, अजित पवारांनी केले स्पष्ट
- Devendra Fadnavis : दुबईला किंवा कुठेही गेला तरी पोलीस कोरटकरला शोधून काढतील, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट