विशेष प्रतिनिधी
बीड : Walmik Karad वाल्मिक कराडच्या वकिलाकडून कोर्टात आरोप मुक्तीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराड याच्यावर लावलेले आरोप मान्य नसल्याचं कराडच्या वकिलांनी म्हंटलं आहे.Walmik Karad
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला या संपूर्ण घटनेचा मास्टरमाइंड म्हणून अटक करण्यात आलेली आहे. धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्ती समजला जाणारा वाल्मिक कराड याने खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा कट रचल्याचं तपासातून पुढे आलं आहे. त्याच्यावर मकोका देखील लावण्यात आलेला आहे. त्यानंतर आता वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांच्याकडून कराडची आरोपातून मुक्तता केली जावी यासाठी न्यायालयात अर्ज सादर करण्यात आलेला आहे. आम्हाला हे आरोप मान्य नसल्याचं कराडच्या वकिलांनी म्हंटलं आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी मकोका कोर्टातील आजची सुनावणी संपली. यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जोरदार युक्तिवाद केला. कट रचून संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं निकम यांनी म्हटलं. तर दुसरीकडे वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी अर्ज केला आहे. वाल्मिक कराडवर लावलेले आरोप मान्य नाहीत, असे म्हणत वकिलांनी कोर्टात अर्ज दाखल केला आहे.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी डिस्चार्ज अॅप्लिकेशन न्यायालयासमोर मांडले. वाल्मिक कराडवर केले गेलेले आरोप आम्हाला मान्य नसल्याचे या अर्जामध्ये म्हटलं आहे. अशा पद्धतीने अर्ज करणे हा न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे.आरोपीचे वकिल अॅड. विकास खाडेंकडून न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला.
विकास खाडे म्हणाले, उज्ज्वल निकम यांनी सांगितलेली सर्व घटना याचे सीडीआर आणि लोकेशन पुरावे वारंवार सांगितले जात आहेत. परंतु यातील काहीच आम्हाला मिळालेले नाही. हे मिळावं यासाठी आम्ही मागील तारखेला अर्ज केलेला आहे. आजही अर्ज केला आहे. हे सर्व पुरावे, कागदपत्र मिळाल्याशिवाय हे पुढे जाता येणार नाही. हे सर्व पुरावे, कागदपत्र मिळाल्याशिवाय हे पुढे जाता येणार नाही. चार्ज प्रेम करता येणार नाही. यावर माननीय न्यायाधीशांनी सर्व कागदपत्र आरोपीच्या वकिलांना उपलब्ध करून देण्यात यावेत असे आदेश दिले. यावर निकम यांनी कागदपत्र आम्ही देतो केस पुढे घेऊन जाऊ शकतो असे म्हणणे मांडले यावर आरोपीचे वकील विकास खाडे यांनी आपण म्हणता म्हणून केस ओपन झाले असे होत नाही. यावेळी आरोपीचे वकील यांनी गोपाल कृष्ण केसचा संदर्भ दिला. एक तासात संपूर्ण मागणी केलेले कागदपत्र दिले जातील असं उज्ज्वल निकम यांनी सांगितले. कागदपत्र मिळाल्यानंतर आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा अशी मागणी केली त्यानंतर माननीय न्यायालयाने मागणी मान्य करत पुढील सुनावणीची तारीख 10 एप्रिल दिली.
Walmik Karad’s Lawyer Files Plea in Court for Acquitta
महत्वाच्या बातम्या
- Disha Salian सामुहिक बलात्कार झालेला नाही. डाेक्याला जखम झाल्यानेच मृत्यू , दिशा सालियनचा पाेस्टमार्टमचा रिपाेर्ट समाेर
- आजही माझ्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटे, आणिबाणीची आपबिती सांगत मुख्यमंत्र्यांचा काॅंग्रेसवर हल्ला
- Harshvardhan Sapkal : बुलढाणा जिल्ह्यातील केस गळतीच्या चौकशी अहवालाची लपवाछपवी का?: हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल
- Supreme Court : अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय असंवेदनशील ठरवत सर्वोच्च न्यायालयाची