विशेष प्रतिनिधी
Mumbai News: प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या (Maharashtra IAS Transfer) करण्याचे आपले सत्र राज्य सरकारने सुरूच ठेवले असून मंगळवार, 8 एप्रिल रोजी पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त होते. त्या पदावर आठवड्याभराने हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिता मेश्राम यांची अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे.
राज्य सरकारने राज्यातील 5 बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत. यामध्ये हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल, महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिता मेश्राम यांचाही समावेश आहे. अभिनव गोयल यांची कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका अर्थात केडीएमसी महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी गेल्या तीन वर्षांपासून इंदुराणी जाखड यांच्याकडे होती. पण 1 एप्रिलला त्यांची पालघर जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्तपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाची महापालिका तसेच मुंबईपासून जवळच असणारं शहर यामुळे केडीएमसी महापालिकेला महत्त्वाचे स्थान आहे. अखेर इंदुराणी जाखड यांच्या बदलीनंतर सात दिवसांनी केडीएमसी महापालिकेला आयुक्त मिळाले आहेत.
अभिनव गोयल हे 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. कानपूर आयआयटीमधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण देखील घेतलं आहे. 2018 मध्ये ते नांदेडला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले होते. यानंतर लातूर जिल्हा परिषदेचे सीईओ, नंतर धुळ्याचे जिल्हाधिकारी अशी त्यांची कारकीर्द आहे. सध्या ते हिंगोलीचे विद्यमान जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. यानंतर आता त्यांची कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बदल्या झशलेले अधिकारी पुढीलप्रमाणे :
1) सी. के. डांगे यांची मुंबईत महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती
2) महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आयएएस संजय काटकर यांची नियुक्ती.
3) महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक असलेल्या आयएएस अनिता मेश्राम यांची आता अकोला येथील जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती.
4) आयएएस अभिनव गोयल हे हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांची नियुक्ती आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तपदी.
5) आयएएस आयुषी सिंह यांची नागपूर येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Maharashtra IAS Transfer April 2025 Five Senior Officers Transferred by State Government
महत्वाच्या बातम्या
- 10th-12th board दहावी- बारावी बाेर्डाची वेबसाईट हाेणार सायबर सुरक्षित, निकालाच्या दिवशी येणार नाही ताण
- Kedar Jadhav : माजी क्रिकेटपटू केदार जाधवची राजकारणात नवी इनिंग
- Phule Movie : चित्रपटामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो, ‘फुले’ चित्रपटावर ब्राह्मण महासंघाच्या नेत्याचा आक्षेप
- Sandeep Deshpande : भैय्यांना मुंबईत, महाराष्ट्रात राहू द्यायचं का, मनसेच्या इशाऱ्याने परप्रांतीय वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे