विशेष प्रतिनिधी
जालना : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी उद्या (मंगळवार) सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.
जरांगे म्हणाले, ज्यांना उपोषणाला बसायचे आहे तेच सहभागी होतील.
कोणावरही दबाव आणला जाणार नाही. शिवाय, घरच्यांचा विरोध असल्यास कोणीही उपोषणाला बसू नये. उपोषणाची तारीख जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील मराठा अंतरवालीत येतील.
छगन भुजबळ यांच्या मंत्रीपद डावलल्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, “तो त्यांचा राजकीय प्रश्न आहे. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांशी आमचे काहीही देणे-घेणे नाही. तो राजकीय विषय आहे, आरक्षणाचा नाही. मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा देताना सांगितले की, “हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचे सर्व प्रश्न निकाली काढले जातील, अशी अपेक्षा आहे.
मात्र, सरकारने आमच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा आम्ही आंदोलनासाठी सज्ज आहोत.”
Manoj Jarange Patil will announce the date of mass hunger strike tomorrow
महत्वाच्या बातम्या
- Raju Shetty साखरेचे दर कोसळल्याचा शेतकरी व ग्राहकांनाही फटका, राजू शेट्टी यांची चौकशीची मागणी
- Sanjay Raut’ : संजय राऊतांचा ‘नैराश्येतून एकला चलोचा नारा , विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
- Vijaya Rahatkar : काही महिलांकडून कायद्याचा गैरवापर, पण त्यामुळे महिला संरक्षण कायद्यांवर प्रश्नचिन्ह लावणे अयोग्य!!
- D Gukesh : बुद्धिबळाचा नवा राजा…ठरला भारताचा डी गुकेश! विजयानंतर अश्रू अनावर झाले